शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून टीम इंडियाला केलं होतं चॅम्पियन, विराट आणि शास्त्री गुरुजींनी संघातून वगळलं

शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून टीम इंडियाला केलं होतं चॅम्पियन, विराट आणि शास्त्री गुरुजींनी संघातून वगळलं

शेवटच्या दोन षटकात 34 धावा हव्या असताना अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून देत संघाला चॅम्पियन बनवलं होतं त्याच खेळाडूला संघात आता जागा नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : दोन वर्षांपूर्वी 18 मार्च 2018 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला होता. तिरंगी मालिकेतील तो अंतिम सामना होता. त्यात भारतानं अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. भारत आणि बांगलादेश यांची निदहास ट्राफीमधील ती अंतिम लढत रोमहर्षक अशी झाली होती. लंकेत झालेल्या सामन्यात भारतावर पराभवाचे सावट होते. पण तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं अविस्मरणीय असा षटकार खेचून भारताला ट्रॉफी जिंकून दिली होती. आज तोच दिनेश कार्तिक संघातून बाहेर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध खेळण्यात आलेल्या टी20 तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये पोहोचला होता. तेव्हा अंतिम सामन्यात भारत आणि बांगलादेश आमने सामने आले होते. बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करत टीम इंडियासमोर 167 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला अखेरच्या दोन षटकात 34 धावा हव्या होत्या. तेव्हा 19 व्या षटकात कोणालाही वाटलं नव्हतं की भारत हा सामना जिंकू शकेल. पण त्या एका षटकात कार्तिकने 22 धावा वसूल केल्या. यात दोन षटकार आणि दोन चौकार लगावले होते.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 12 धावा हव्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकला स्ट्राइक मिळाला. तेव्हा त्यानं एकेरी धाव घेतली आणि विजय शंकर स्ट्राइकला आला. त्यानं चौथ्या चेंडूवर चौकार मारला. आता भारताला विजयासाठी दोन चेंडूत 6 धावा हव्या होत्या. पण विजय शंकर पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. तेव्हा कार्तिक एक धाव घेत स्ट्राइकला आला होता. अखेरचा चेंडू आणि विजयासाठी षटकार हवा होता. कार्तिकने कमाल करत षटकार मारला आणि अशक्य वाटणार विजय मिळवून देत संघाला चॅम्पियन केलं. त्याने फक्त 8 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद 29 धावा काढल्या होत्या.

हे वाचा : धोनीचं कमबॅक होणार की नाही? टीम इंडियाबद्दल सेहवागचं मोठं वक्तव्य

सध्या दिनेश कार्तिक टीम इंडियाच्या तीनही फॉर्मेटमधून बाहेर आहे. धोनी संघाबाहेर असूनही कार्तिकला स्थान मिळवता आलेलं नाही. एकदिवसीय आणि टी20 मध्ये केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. तर कसोटीत ऋद्धीमान साहाकडे यष्टीरक्षण सोपवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कप संघात असलेल्या कार्तिकला त्यानंतर संघात जागा मिळालेली नाही.

हे वाचा : IPL लिलावात लागली कोट्यवधींची बोली, आता एका फटक्यात 'हे' खेळाडू होणार कंगाल

 

First published: March 18, 2020, 3:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या