India vs West Indies : विंडिजच्या खेळाडूंमध्ये राहिली नाही ती 'दशहत', टीम इंडियानं 17 वर्षात मिळवलं वर्चस्व

India vs West Indies : विंडिजच्या खेळाडूंमध्ये राहिली नाही ती 'दशहत', टीम इंडियानं 17 वर्षात मिळवलं वर्चस्व

विराटसेनेनं 2-0नं विंडिंजवर क्लीन स्विप दित मालिका खिशात घातली.

  • Share this:

जमैका, 03 ऑगस्ट : क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिजच्या गोलंदाजां विरोधात फलंदाजी करण्यासाठी खेळाडू घाबरायचे. 7 फूट उंचीच्या फलंदाजांना गोलंदाजी करायची म्हणजे गोलंदाज थरथर कापायचे. आता मात्र विपरीत परिस्थिती झाली आहे. जो संघ वेस्ट इंडिज विरोधात सर्व मालिका गमवून मायदेशी परतत होता, आज त्याच भारतीय संघानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवले.

भारतीय संघानं वेस्ट इंडिज विरोधात झालेला दुसरा कसोटी सामना तब्बल 257 धावांनी जिंकला. यासह विराटसेनेनं 2-0नं विंडिंजवर क्लीन स्विप दित मालिका खिशात घातली. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये 120 गुणांसह गुणतालिकेत पहिला क्रमांकही मिळवला. याआधी भारतानं टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही विडिंजचा सुपडासाफ केला होता.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं दिलेल्या 468 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला. विंजीजकडून शामरा ब्रूक्सनं दुसऱ्या डावात सर्वाधिक 50 धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डरनं 39 आणि ब्लॅकवूडनं 38 धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मानं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या बुमराहनं दुसऱ्या डावात एक गडी बाद केला.

वाचा-क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना, 12 सामन्यात भारतीय क्रिकेटपटू पोहचला तिसऱ्या स्थानी

वेस्ट इंडिज विरोधात भारताचा कसोटी इतिहास हा तब्बल 71 वर्ष जुना आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये तब्बल 24 कसोटी मालिका झाल्या आहे. यात भारतानं 10 मालिकेत विजय मिळवला आहे. तर, आतापर्यंत 2 सामना अनिर्णित राहिले आहेत आणि 12 मालिकांमध्ये वेस्ट इंडिजनं विजय मिळवला आहे.

2002नंतर विडिंजना उतरती कळा

एक काळ असा होता जेव्हा वेस्ट इंडिजला कसोटी क्रिकेटचा बादशाह असे म्हटले जायते. मात्र 2002नंतर परिस्थिती बदलली. भारतीय संघाला पहिली मालिका जिंकण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. मात्र, 2002-2019 या 17 वर्षांत वेस्ट इंडिज विरोधात भारतानं सलग 8 मालिका जिंकल्या. यात एकही मालिका विजय विंडिजला मिळवला आला नाही. या दरम्यान झालेल्या 23 कसोटी सामन्यात भारतानं 14 सामने जिंकले.

वाचा-कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा धमाका, पाहा कोण कितव्या स्थानी

टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत अव्वल

विंडीजविरुद्धची दोन कसोटीस सामन्यांची मालिका जिंकून भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. या मालिका विजयासह चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात 120 गुणांसह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतानंतर दुसऱ्या स्थानावर न्यूझील़ंड आहे. लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा एक विजय आणि एक पराभव झाला आहे. या दोन्हींचे प्रत्येकी 60 गुण झाले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अॅशेस मालिकेपासून सुरुवात झाली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर एक अनिर्णित राहिला. यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 32 गुण झाले आहेत.

वाचा-भारताचा विंडीजवर क्लीन स्विप, दुसऱ्या कसोटीत 257 धावांनी विजय

VIDEO : बाबा रामदेव यांच्या मेळाव्यात दुकानदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

First published: September 3, 2019, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading