मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IND vs SL : फक्त 1 धाव आणि कोहली टाकणार सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना मागे

IND vs SL : फक्त 1 धाव आणि कोहली टाकणार सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना मागे

कर्णधार विराट कोहलीचे वय आणि त्याचा खेळ पाहता तो पुढची पाच वर्षे तरी संघात आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तिसऱ्या स्थानी खेळणाऱा कोहली आपले स्थान कायम राखू शकतो.

कर्णधार विराट कोहलीचे वय आणि त्याचा खेळ पाहता तो पुढची पाच वर्षे तरी संघात आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तिसऱ्या स्थानी खेळणाऱा कोहली आपले स्थान कायम राखू शकतो.

कॅप्टन कोहली 'विराट' वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर! वाचा कोणता आहे हा विक्रम.

    पुणे, 10 जानेवारी : भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत विराटनं चांगली खेळी केली होती. दरम्यान श्रीलंकाविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही विराटनं षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला होता. मात्र श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात विराटकडे एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. कोहलीनं दुसऱ्या टी-20 सामन्यात इंदूरमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर आता पुण्यात आज होणाऱ्या सामन्यात विराट आपल्या करिअरमध्ये 11 हजार धावा पूर्ण करु शकतो. यासाठी विराट फक्त 1 धाव मागे आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात विराटनं 30 धावांची खेळी केली होती. यासह विराटच्या नावावर 10 हजार 999 धावा आहेत. त्यामुळं फक्त 1 धाव करत विराट सर्वात जलद 11 हजार धावा पूर्ण करणारा जगातला पहिला फलंदाज ठरेल. तर, अशी कामगिरी करणारा जगातील सहावा आणि दुसरा भारतीय कर्णधार असेल. वाचा-‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट! कॅप्टन कोहलीच्या नावावर एक खास विक्रम विराट कोहलीनं आतापर्यंत आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार 999 धावा केल्या आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व करतानाही विराटनं तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 83 एकदिवसीय सामन्यात विराटनं 77.60च्या सरासरीनं 4 हजार 889 धावा केल्या आहेत. तर, 53 कसोटी सामन्यात 63.80च्या सरासरीनं 5 हजार 104 आणि 32 टी-20 सामन्यात 1006 धावा केल्या आहेत. वाचा-बाउंड्री बाहेर घेतला कॅच, तरी फलंदाज झाला बाद! पाहा क्रिकेटमधला वादग्रस्त VIDEO पुण्यात होणार अखेरचा टी-20 सामना भारत-श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आज पुण्यात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशिनवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळला जाणार आहे. दरम्यान या मालिकेत गुवाहटीमध्ये पहिला सामना रद्द झाला होता. तर, इंदोरमध्ये भारतानं विजय मिळवत 1-0नं आघाडी घेतली होती. त्यामुळं ही मालिका आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडियाला पुण्यात आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. वाचा-धोनी वनडे क्रिकेटमधून लवकरच घेऊ शकतो निवृत्ती, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, L Virat Kohli

    पुढील बातम्या