विराट सेनेचं 'सर्जिकल स्ट्राईक', पाकचा उडाला धुव्वा

विराट सेनेचं 'सर्जिकल स्ट्राईक', पाकचा उडाला धुव्वा

  • Share this:

४ जून : ज्या प्रकारे भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकला धडा शिकवला होता. तशाच प्रकारे विराट सेनेनं बर्मिंगममध्ये  सर्जिकल स्ट्राईक करत पाकचा धुव्वा उडवलाय.   विराट सेनेनं उभारलेला धावांचा डोंगर सर करणं तर दूरच टीम इंडियाच्या बॉलर्सच्या  भेदक माऱ्यापुढेच पाकची टीम बर्मिंगममध्ये वाहून गेली. पाकचा अवघा संघ १६४ रन्सवर ढेर झाला. भारताने तब्बल १२४ रन्सने दणदणीत  विजयाची नोंद केली.

टीम इंडियाने पाकिस्तानसमोर ३१९ धावांचा डोंगर उभारला.  पण पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पाकचं काम आणखी सोपं झालं पाकला ४१ ओव्हर्समध्ये २८९ रन्स करायचे होते. परंतु, अवघा संघ १६४ रन्सवर गारद झाला. पत्याच्या बंगल्याप्रमाणे पाक टीम अक्षरश : गडगडली.

पाकची टीम मैदानात उतरली ती सावध पवित्रा घेऊनच. अहमद शहजाद आणि अजहर अलीने विकेट न जाऊ देता नवव्या ओव्हर्सपर्यंत टीकून फलंदाजी केली. पण ४७ रन्सवर असताना भुवनेश्वरने शहजादला आऊट करून जोडी फोडली. त्यानंतर ६१ रन्सवर पाकला दुसरा झटका बसला.  उमेश यादवने दुसरी विकेट घेतली. त्यानंतर आलेल्या बाबर आजमने फटकेबाजी सुरू केली पण तोही ८ रन्सवर आऊट झाला.

 

पाकवर दबाव वाढत गेला. अजहर अलीने टीमची कमान सांभाळत अर्धशतकी खेळी पूर्ण केली. टीम इंडियासाठी अजहरची खेळी डोकीदुखी ठरू लागली. तेव्हाच हार्दिक पांड्याने झेल घेत अजहरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.  यानंतर मोहम्मद हफीजवर पाकची मदार होती. त्याने ३३ रन्सची खेळी केली. तर शोयब मलिक आणि सरफराज अहमद १५-१५ रन्स करून आऊट झाले. वसीम भोपळाही न फोडता माघारी परतला. भारताकडून उमेश यादवने ३ विकेट तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर भुवनेश्वरने एक विकेट घेतली.

संपूर्ण स्कोअर पाहा इथं 

भारताची इनिंग

 रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहलीने तडाखेबाज खेळी करत पाकिस्तानसमोर ३२० धावांचा डोंगर उभा केलाय. पण डकवर्थ लुईसप्रमाणे पाकिस्तानला 48 षटकात विजयासाठी 324 धावा कराव्या लागणार आहे.

क्रिकेट जगतात सर्वाधिक उत्सुकता असलेली लढत म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आता तर तब्बल दोन वर्षांनंतर भारत-पाकिस्तानच्या टीम आमने-सामने आली.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिलाच सामन्यात विराट सेनेनं तडाखेबाज खेळी केली. पाकने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं.ओपनिंग जोडी  रोहित आणि शिखरने सावध सुरूवात केली. दहाव्या ओव्हर्स पर्यंत भारताचा स्कोअर फारसा वाढला नाही.त्यातच पावसामुळे दोनदा सामना थांबवावा लागला.

 

त्यामुळे ५० ओव्हर्सचा सामना ४८ ओव्हर्सचा करण्याचं आला. रोहितने शानदार ९१ रन्स केलेमापण रनआऊट झाल्यामुळे शतक मात्र हुकले. त्यानंतर विराटने टीम इंडियाची कमान सांभाळली आणि अखेरपर्यंत पाकच्या बॉलर्सची धुलाई केली. विराटने नाबाद 77 रन्स केले. धवन ६८ रन्सवर आऊट झाल्यानंतर युवराज मैदानात उतरला.आपल्या नावाला साजेशीर इनिंग पेश केली.

 

युवराजने ३२ बॉल्समध्ये तुफान फटकेबाजी करत ५२ रन्स केले. युवराज आऊट झाल्यानंतर धोणी ऐवजी हार्दिक पांड्या मैदानात उतरला आणि सलग ३ सिक्स लगावत टीम इंडियाची स्कोअर ३०० पार नेला. अखेरच्या तीन ओव्हर्समध्ये विराट सेनेनं चौकार आणि षटकार लगावत मैदान दणाणून सोडलं. विराट आणि युवराज जोडी विजयाचे मानकरी ठरले. तडाखेबाज फलंदाजी करणारा युवराज सिंग सामनावीर ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 11:15 PM IST

ताज्या बातम्या