मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IND vs ENG : महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात मिस करू नका हा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IND vs ENG : महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपात मिस करू नका हा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

पाचव्या टी-20 मध्ये भारतीय बॅट्समननी इंग्लंडच्या (India vs England) बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली, पण क्रिस जॉर्डनने (Chris Jordan) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आऊट करण्यासाठी मैदानात केलेल्या कामगिरीचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

पुढे वाचा ...

    अहमदाबाद, 20 मार्च : पाचव्या टी-20 मध्ये भारतीय बॅट्समननी इंग्लंडच्या (India vs England) बॉलर्सची यथेच्छ धुलाई केली, पण क्रिस जॉर्डनने (Chris Jordan) मैदानात केलेल्या कामगिरीचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये धमाका करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) या मॅचमध्येही इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 17 बॉलमध्ये 32 रन करून सूर्यकुमार यादव माघारी परतला.

    14व्या ओव्हरमध्ये लेग स्पिनर आदिल रशीदच्या (Adil Rashid) बॉलिंगवर सूर्यकुमारने सिक्स मारण्यासाठी मोठा शॉट मारला, पण बाऊंड्री लाईनवर उभा असलेला क्रिस जॉर्डन चित्त्याच्या वेगाने पळत आला आणि त्याने कॅच पकडला. पाय बाऊंड्री लाईनला लागेल, हे लक्षात येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता बॉल तिकडेच उभ्या असलेल्या जेसन रॉयच्या हातात दिला आणि रॉयने हा कॅच पूर्ण केला.

    विराट कोहली, रोहित शर्माचं अर्धशतक आणि सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे भारताने इंग्लंडला 225 रनचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ओपनिंगला आले. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 9 ओव्हरमध्ये 94 रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा 34 बॉलमध्ये 64 रन करून आऊट झाला, तर विराट कोहली 52 बॉलमध्ये 80 रनवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने 17 बॉलमध्ये 32 रन केले आणि हार्दिक पांड्याने 17 बॉलमध्ये नाबाद 39 रनची खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि बेन स्टोक्सला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

    First published:
    top videos