मेलबर्न, १८ जानेवारी २०१९- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकली. हा पहिला संघ आहे ज्यांनी या दौऱ्यात टी२०, कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली नाही. एकीकडे अप्रतिम सामन्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर दुसरीकडे सोशल मीडियावर कॉमेंट्री स्टुडिओमधला एक असा व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामुळे या सामन्याला अजून रंगत आली.
माजी क्रिकेटर संजय मांजरेकरने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो टायगर जिंदा है या सलमान खानच्या सिनेमातले दिल दियां गल्लां हे गाणं गायलं.
When you guys are on commercial break...: https://t.co/zILHJrsFNu via @YouTube
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) January 17, 2019
संजयने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, जेव्हा तुम्ही कमर्शियल ब्रेकवर जाता...
हा व्हिडिओ शेअर करताना संगीत दिग्दर्शक विशाल ददलानीने लिहिलं की, ‘वा संजय मांजरेकर... तुम्ही तुमच्या या गुणांबद्दल कधी सांगितलं नाही.’
Arre wah, @sanjaymanjrekar !! You've never mentioned this hidden talent before! Very impressive! They should've kept that on air! #DilDiyanGallan https://t.co/ROBNUMk0oS
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 17, 2019
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली. याआधी १९८५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २००८ मध्ये सीबी सीरीज जिंकली होती.
VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन