आयपीएलचा 'हा' सुपरस्टार आज टी२० मध्ये करणार पदार्पण

पंजाबचा मुंबईकर आता भारतीय संघात पदार्पण करायला सज्ज झाला आहे.

  • Share this:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात बीसीसीआयने एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे तो म्हणजे मयंक मार्कंडेय.

नुकत्याच झालेल्या भारत ए विरुद्ध इंग्लंड लॉयन्स या सामन्यात त्याने 5 गडी बाद केले होते.  मयंक लेग स्पिन गोलंदाज आहे.  तो आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो.

लेग स्पिनर असलेल्या मयंकाल प्रशिक्षकांनी सल्ला दिला नसता तर वेगवान गोलंदाज म्हणून खेळला असता. त्यातून मयंक इथपर्यंत पोहचू शकला नसता. पंजाब अंडर-14 मध्ये वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयंकला लेग स्पिन गोलंदाजी करण्यास प्रशिक्षकांनी सांगितले होते.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात आल्यानंतर त्याने लिस्ट-ए टी20 आणि रणजी पदार्पण केलं. त्याने एका वर्षाच्या आतच भारतीय संघात स्थान मिळवलं. रणजीत त्याने पंजाबकडून खेळताना 6 सामन्यात 29 गडी बाद केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झाल्याचा फोन आल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्काच बसल्याचे मयंकने एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. मला वाटलं नव्हतं की माझी निवड होईल. निवड झाली असल्याचं सांगणारा फोन आला तो क्षण आयुष्यभर विसरणार नाही असंही त्यानं म्हटलं आहे. त्यानंतर मयंकच्या फोनवर 300 मेसेज आणि 42 मिस कॉल आले होते.

आयपीएलमध्ये मयंकला 2018 मध्ये मुंबई इंडियन्सनं घेतलं होतं. त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने दाखवलेला विश्वास मयंकने सार्थ ठरवला होता.त्याने आयपीएलच्या 14 सामन्यात त्याने 15 गडी बाद केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या