S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

हा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीय.

Updated On: Jul 7, 2018 08:43 AM IST

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

इंग्लंड, 07 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झालाय. इंग्लंडचा मधल्या फळीतला फलंदाज अॅलेक्स हेल्सने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवला. हा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीय.भारतावर ५ गडी राखून मात करत इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत रंगत निर्माण केली. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १४८ धावांपर्यंत मजल मारली.

मेश यादवने जेसन रॉय आणि जोस बटलर यांना माघारी धाडत इंग्लंडला मोठे धक्के दिले. यानंतर जो रुटही युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड होऊन माघारी परतला. मात्र यानंतर अॅलेक्स हेल्सने इतर फलंदाजांना हाताशी घेऊन इंग्लंडच्या डावाला आकार दिला. अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र हेल्सने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाच्या विजयावर सहजरित्या शिक्कामोर्तब केलं. भारताकडून उमेश यादवने २, युझवेंद्र चहल-भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 08:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close