अधिवेशनात आता प्रवचनही होणार? आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 06:30 AM IST

अधिवेशनात आता प्रवचनही होणार? आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

अधिवेशनात होणार प्रवचन?

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. आज विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 'ब्रम्हकुमारी विश्वविद्यालया' बहन शीवानी यांचं प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुण्यात कर्णबधीर आंदोलन

पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर तरुणावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या प्रकऱणानंतर विद्यार्थ्यांनी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.

राममंदिरावर सुनावणी

Loading...

अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त भूखंडप्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने 5 न्यायाधीशांचे विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. यात जस्टिस रंजन गोगई, जस्टिस एस.ए बोबडे एन.वी रमन्ना, यूयू ललित आणि डीवाई चंद्रचुड यांचा समावेश आहे.मागील सुनावणीमध्ये मोदी सरकारने अयोध्येतील वादग्रस्त जागा वगळता अन्य जागा परत करण्याची मागणी केली आहे. तसेच या जागेवरील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मागे घ्यावेत, अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली.

काश्मीर 35अ तरतुदीसंदर्भात सुप्रीम सुनावणी

जम्मू-काश्मिरमधील विशेष दर्जा देणारं 35 अ तरतुदीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सोमवारी सुनावणी होणार होती, परंतु, ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली. या तरतुदीवरून काश्मिरमध्ये वातावरण तापले आहे.

प्रजा फाउंडेशनची पत्रकार परिषद

राज्यातील कायदा आणि सुवव्यस्थेबद्दल मुंबईतील प्रसिद्ध प्रजा फाउंडेशन आज आपला अहवाल सादर करणार आहे. यासाठी फाउंडेशनने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. प्रजा फाउंडेशन दरवर्षी मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर अहवाल तयार करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...