राज ठाकरे देणार आंगणेवाडीच्या यात्रेला भेट... 'या' आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

राज ठाकरे देणार आंगणेवाडीच्या यात्रेला भेट... 'या' आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या

  • Share this:

राज्य अधिवेशनाला सुरुवात

राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आज सकाळी विधीमंडळात राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव हे 11 वाजता अंतरिम अंर्थसंकल्पीय भाषण देतील. अभिभाषण संपल्यानंतर ३० मिनिटांच्या विश्रांतीनंतर विधानपरिषदेच्या बैठकीचे कामकाज सुरू होईल.

ओबीसी एल्गार मोर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ओबीसी समाजाने मोर्चा आयोजित केला आहे. आरक्षण आणि विविध मांगण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

भीमा कोरेगाव कृती समितीची पत्रकार परिषद

पुण्यात भीमा कोरेगाव कृती समितीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत कृती समितीकडून सरकारडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आंगणेवाडी यात्रेत

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज ते प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेत सहभागी होणार आहे. दरवर्षी राज ठाकरे आंगणेवाडीच्या यात्रेत सहभागी होत असतात. दरम्यान, राज यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे.

काँग्रेसची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व वरिष्ठ आणि राज्यातील प्रमुख नेते हजर राहणार आहे.

==================

First published: February 25, 2019, 6:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading