काँग्रेस-राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर होणार? आजच्या 5 मोठ्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 06:30 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर होणार? आजच्या 5 मोठ्या बातम्या

भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार आहे. डॉ भारती पवार या आज भाजपात प्रवेश करणार आहे. आज 1 वाजता मुंबईत वानखेडे स्टेडियमवरील MCA हॉलमध्ये होणार हा प्रवेश सोहळा होणार आहे. डॉ भारती यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्तेही भाजपात प्रवेश करणार आहे.

उद्धव ठाकरेंची सभा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित सभा होणार आहे. भाजपने पालघरची जागाही सेनेसाठी सोडली आहे.

आघाडीची तिसरी यादी

Loading...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील दोन्ही यादीत एकूण 17 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यात माढ्यातून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

शिवसेनेची यादी

भाजपने आपली पहिली 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता शिवसेनाही आपली पहिली यादी जाहीर करण्याची आज शक्यता आहे. या यादीत पालघरमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

भाजपची बैठक

भारतीय जनता पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती बैठक दिल्लीत पार पडणार आहे. आज सकाळी अकरा वाजता भाजपच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे.


=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...