उद्धव ठाकरे-फडणवीस भेट...या आहेत 5 मोठ्या बातम्या

उद्धव ठाकरे-फडणवीस भेट...या आहेत 5 मोठ्या बातम्या

  • Share this:

शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच

फडणवीस सरकारने फसवणूक केली, असं म्हणत शेतकरी आणि आदिवासींनी पुन्हा एकदा मुंबापुरीकडे कूच केली आहे. नाशिक ते मुंबई असा हा लाँग मार्च असणार आहे. या लाँग मार्चमध्ये जवळपास 40 हजार शेतकरी सहभागी झाले आहे. हा मार्च 27 फेब्रुवारीला विधानभवनावर धडक देणार आहे.

धनगर आरक्षणावर चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होणार आहे. या भेटीत धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे.

आॅल द बेस्ट...

राज्य उच्च माध्यमिक महामंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12 वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. राज्यभरात परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्चीही बारावीची परीक्षा देणार आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांकडून कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ती पोलिसांची सुरक्षा घेऊन टेंभुर्णी परीक्षा केंद्र गाठणार आहे.

शरद पवार सोलापुरात

नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर राज्यभरात प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहे. माढा इथं पवारांची पहिली सभा होणार आहे. या मतदारसंघातून पवार निवडणूक लढवणार आहे.

गडचिरोलीत आदिवासींचा ठिय्या

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तसंच विकासापासून दूर असलेल्या पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा याकरिता आसपासच्या 50-60 गावातील गावकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं आहे. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव  घेण्यात आला आहे. शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांनी अखेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून हजारो आदिवासींनी या आंदोलनात हजेरी लावली आहे.


=====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 08:37 AM IST

ताज्या बातम्या