या आहेत दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

या आहेत दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे.

  • Share this:

मुख्यमंत्री आणि पवार एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहे. दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक होणार आहे.

धनगर आरक्षणासाठी बैठक

धनगर आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक होणार आहे.

दानवे-खोतकर एकाच व्यासपीठावर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. परंतु, ऐकमेकांविरोधात उभं राहण्याची भाषा करणारे दोन नेते आज एकत्र येणार आहे. जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेचे मंत्री अर्जून खोतकर भाजपच्या आरोग्य शिबिरानिमित्ताने एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

नाशकात संभाजी राजेंची बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. छावा क्रांतीवीर संघटनेची ही बैठक होत आहे. या बैठकीत नाशिक लोकसभा निवडणुकीबद्दल लेखाजोखा मांडला जाणार आहे.

सेनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा

रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर सेनेचे नेते विनायक राऊत यांची सभा रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी सभा पार पडणार आहे.

============

First published: March 2, 2019, 6:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading