अमित ठाकरेंचं आज लग्न, अनेक दिग्गजांची हजेरी! आजच्या महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंचं आज लग्न, अनेक दिग्गजांची हजेरी! आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:


  • मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित याचं आज लग्न होतंय. मुंबईतल्या लोअर परळ इथल्या सेंट रेजिस होटेलमध्ये हे लग्न होणार  आहे. या सोहळ्याला राजकारण, उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहे.  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपला पर्याय ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीची सभा आज कल्याणला होत आहे. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असादुद्दीन ओवेसी हे सभेला उपस्थित राहतील. काँग्रेसने आंबेडकरांना ऑफर दिली होती. तर आंबेडकरांनीही काँग्रेसला आपल्या अटी सांगितल्या होत्या. त्यामुळे ते कुठली भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  • पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. CBI आणि EDने एक खास प्लान तयार केला असून चोक्सी आणि नीरव मोदीलाही भारतात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मध्ये बोलणार आहेत. 2019 हे नवं वर्ष सुरू झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मन की बात आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यातल्या भाजपच्या बुथ प्रमुखांशी चर्चा करणार आहे. मोदी यांनी देशभरातल्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मोहिमच हाती घेतली असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या