News18 Lokmat

Morning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

आज महाराष्ट्रभर दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. या सोहळ्यासोबतच महाराष्ट्रातला या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्यांकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या या 5 बातम्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 07:43 AM IST

Morning Alert: या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सर्व राजकिय पक्षांचे लक्ष लागले आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात याकडे इतर पक्षांपेक्षा भाजपचं जास्त लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार की युतीबाबत सकारात्मक राहणार हे दसऱ्या मळाव्यातल्या त्यांच्या भाषणावर ठरणार आहे. सविस्तर वाचा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. महागाई, इंधन दरवाढ, राममंदिर,  मी टू इत्यादी मुद्द्यांवरुन राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भुमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा...

भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंना भगवानगड सोडावा लागला. त्यानंतर भगवानबाबांच्या जन्मस्थानी अर्थात सावरगावात भव्य स्मारक उभं करत मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी राजकीय शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. सविस्तर वाचा...

आज शिर्डीत साईबाबांचा शंभरावा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातोय. शिर्डीत तीन दिवस या उत्सवाची धूम असते. विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी शिर्डी फुलून गेली आहे. सविस्तर वाचा...

'नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य, पण तो असं काही करेल हे मान्य नाही' असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली. तसंच पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी नक्की करावा पण...  सविस्तर वाचा...

Loading...

पंधरा महिला पत्रकारांच्या गंभीर आरोपानंतरही खुर्चीला चिकटून राहणारे एम.जे. अकबर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या सरकारला अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे झुकावं लागलं. आपल्यावर झालेले लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे आहेत आणि आपण न्यायालयात ते सिद्ध करू असं सांगत अकबर यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. पण...! सविस्तर वाचा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2018 07:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...