भारतीय लष्कराची ताकद वाढली, पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय लष्कराची ताकद वाढली, पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

दोन वेळा झालेल्या या चाचणीमध्ये पिनाकाने 90 किमी. लांबचं टार्गेट हिट केलं आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : सोमवारी भारतीय लष्कराला मोठं यश आलं आहे. भारताने ओडिशाच्या बालासौरमध्ये पिनाका क्षेपणास्त्राचं 2 वेळा यशस्वीरित्या चाचणी केली आहे. दोन वेळा झालेल्या या चाचणीमध्ये पिनाकाने 90 किमी. लांबचं टार्गेट हिट केलं आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली असं म्हणायला हरकत नाही.

मागच्या वर्षी मे महिन्यात ओडिशाच्या चांदीपूरमध्ये प्रूफ अन्ड एक्सपेरीमेंट एस्टॅब्लिशमेंट तर्फे पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.  मार्गदर्शक प्रणाली असलेल्या या रॉकेटची क्षमता वाढवण्यात आली आहे. तर या रॉकेटच्या 2 चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून याच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला पिनाका रॉकेटमध्ये मार्गदर्शक प्रणाली नव्हती. पण आता यामध्ये या प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात, हैदराबाद रिसर्च सेंटर बिल्डिंग (आरसीआय) ने दिशानिर्देश आणि नियंत्रण किट विकसित केलं आहे. दरम्यान, आरसीआय हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटने (डीआरडीओ)च्या अंतर्गत येतं.

VIDEO : 'इंजिना'ला टाटा करून मनसेचे एकमेव आमदार शिवसेनेत दाखल

First published: March 11, 2019, 6:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading