नवी दिल्ली 30 जून : पाकिस्तानातल्या बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणखी अत्याधुनिक शस्त्र-अस्त्रांनी सज्ज होणार आहे. भारताचा विश्वासू मित्र असलेल्या रशियाकडून भारत अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. यासाठी 200 कोटींचा करार भारताने रशियासोबत केलाय. MI-35 या लढाऊ हेलिकॉप्टरवर ही क्षेपणास्त्र लावली जाणार असून त्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे.
भारताच्या लष्कराच्या शस्त्रपुरवढ्यात सर्वात जास्त खरेदी ही रशियाकडून केली जाते. आपल्या खेरदीपैकी 70 टक्क्यांच्या आसपास खरेदी ही रशियाकडून केली जाते. तर रशियाही भारताला शस्त्र विक्रीसाठी तत्पर असतो. याच टप्प्याचा भाग म्हणून ही खरेदी केली जाणार आहे. अचूक निशाणा आणि अजस्त्र क्षमता या नव्या क्षेपणास्त्रांची असणार आहे.
India signs Rs 200 crore anti-tank missile deal with Russia
— ANI Digital (@ani_digital) June 30, 2019
Read @ANI story | https://t.co/np18AbQgiP pic.twitter.com/9PgnmDaxO3
कमी उंचीवरून मारा पण शत्रूच्या टप्प्यात येणार नाही असं या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट आहे. त्याच्यावर ही नवी यंत्रणा लावल्यास या हेलिकॉप्टरची मारक क्षमता कितीतरी पट जास्त होणार आहे. तातडीच्या खरेदीअंतर्गत ही खरेदी केली जाणार आहे. लष्कराच्या मागणी विभागाने काही दिवसांपूर्वीच संरक्षणंत्री राजनाथसिंग यांच्यापुढे या क्षेपणास्त्राचं सादरीकरण केलं होतं. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला गेला.
अमेरिकेकडूनही शस्त्रास्त्र खरेदी
देशाच्या सुरक्षेला आता सरकार प्राधान्य देत आहे. त्या दृष्टीनं भारतानं आता महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. भारत सरकार अमेरिकेकडून तब्बल 10 बिलियन अमेरिकी डॉलरची शस्त्र खरेदी करणार आहे. अमिरेकेसोबत खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दौरा देखील करणार आहेत. यासाठी डीएसीची देखील स्थापना करण्यात आली आहे. डीएसीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह असणार आहेत. दरम्यान, डीएसीनं कामाला सुरूवात केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
खरेदीला सुरूवात
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं शस्त्रास्त्र खरेदीला सुरूवात देखील केली आहे. मागील आठवड्यामध्ये अमेरिकेनं आठ Long Range Petrol Aircraft P – 8च्या खरेदीवर शिक्कामोर्बत देखील केलं. यापूर्वी भारतानं याच श्रेणीतील विमानांची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिका भारताकडे Long Range Petrol Aircraft P – 8 सोपवणार आहे.
या श्रेणीतील विमानं ही अद्ययावत अशी आहेत. पाणबुडीला शोधून नष्ट करण्याची क्षमता देखील या विमानांमध्ये आहे. 12 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करण्यात येणार आहे.