भारताने पाकिस्तानकडे केली ही मागणी, हवाय फ्री व्हिसा

भारताने पाकिस्तानकडे केली ही मागणी, हवाय फ्री व्हिसा

गुरुवारी अटारीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सचिव स्तरावर पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये व्हिसासंबंधी काही मागण्या भारताकडून करण्यात आल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मार्च : सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यात आता भारताने पाकिस्तानकडे एक मागणी केली आहे. करतारपूर साहिब यात्रेवर भारताने पाकिस्तानकडे मोफत व्हिसा करण्याची मागणी केली आहे.

अटारीमध्ये झालेल्या बैठकीनंतर भारतीय प्रतिनिधींनी मीडियाला सांगितले की, भारताने पाकिस्तानकडे करतारपूर साहिब यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना व्हिसा शिवाय यात्रा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर दिवसाला 5000 भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
गुरुद्वारा करतारपूर साहिबसाठी कॉरिडोर तयार करण्यासाठी गुरुवारी अटारीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सचिव स्तरावर पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये व्हिसासंबंधी काही मागण्या भारताकडून करण्यात आल्या. तर यासंबंधी पुढील बैठक ही 2 एप्रिलला वाघामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या प्रकरणात दोन्ही देशांच्या बैठकीच्या आधी पाकिस्तानने भारताला 59 पानांचं एक दस्तावेज पाठवलं होतं. त्यात पाकिस्तानकडून 14 मागण्यात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या मागण्यांवर दोन्ही देशांची सहमती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


VIDEO : माझे वडील आज हयात नाही, पवारांचं असं बोलणं किती योग्यतेचं? - विखे पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 05:46 PM IST

ताज्या बातम्या