COVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, तब्बल 80% रुग्ण झाले बरे

COVID-19 रिकव्हरीमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला भारत, तब्बल 80% रुग्ण झाले बरे

भारतात कोरोना रुग्ण लवकर बरे होत आहेत. या जीवघेण्या संसर्गापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होताना दिसत आहे. रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. आताही गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 93,337 नवीन प्रकरण समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रोजच्या वाढत्या आकडेवारीमुळे देशात कोरोनाची एकूण आकडेवारी 53,08,015 इतकी आहे तर यामध्ये 10,13,964 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

भारतात कोरोना रुग्ण लवकर बरे होत आहेत. या जीवघेण्या संसर्गापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात जास्त आहे. यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. एकूण जागतिक रिकव्हरी रेटमध्ये भारताचा 19% वाटा आहे. तर भारतातील79.28% रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे झाले आहेत.

'बरं झालं मी आता जेलमधून बाहेर आहे', कोरोनाच्या संकटात भुजबळांना आठवलं कारागृह

गेल्या 24 तासांत 95880 रूग्णांना घर, कोविड सेंटर किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 16 सप्टेंबरपासून भारतात दररोज 80,000 हून अधिक रुग्ण बरे होत आहेत ही भारतीयांसाठी सगळ्यात दिलासादायक बाब आहे. देशात एकूण 42 लाखांच्या पुढे कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूदेखील कमी होत आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के आहे. तर देशात नवीन रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा रुग्ण बरे होण्याची आकडेवारी ही समाधानकारक आहे.

5 राज्यांमध्ये सगळ्यात अधिक प्रकरणं समोर आली त्याचबरोबर या राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही जास्त आहे. 60 टक्के रिकव्हरीची प्रकरणं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातून आहेत. नव्या रिकव्हरी रेटमध्ये महाराष्ट्राचं 22,000 (23%) योगदान आहे, तर आंध्र प्रदेशचं 11,000 (12.3%) योगदान आहे.

दोन मुलं आणि पत्नीसह सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक आहे कारण

दरम्यान, कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2021 साल. हो पुढच्या वर्षीच कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. 2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होईल, आपण सामान्य परिस्थितीत येऊ, अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केलं.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 19, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या