• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • नेहरूंना पाठिंबा देणारे जगजीवन राम राजीव गांधींच्या विजयावर होते नाखूश

नेहरूंना पाठिंबा देणारे जगजीवन राम राजीव गांधींच्या विजयावर होते नाखूश

देशाचे चौथे उपपंतप्रधान जगजीवन राम (Babu Jagjivan Ram) यांची 5 एप्रिल ही जयंती. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या 1946 सालच्या अंतरिम मंत्रिमंडळापासून ते आणिबाणीपर्यंतच्या मंत्रिमंडळांत आपलं पद कायम राखणारे अशी जगजीवन यांची ओळख आहे.

 • Share this:
  दिल्ली, 5 एप्रिल: देशाचे चौथे उपपंतप्रधान जगजीवन राम (Babu Jagjivan Ram) यांची 5 एप्रिल ही जयंती. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या 1946 सालच्या अंतरिम मंत्रिमंडळापासून ते आणिबाणीपर्यंतच्या मंत्रिमंडळांत आपलं पद कायम राखणारे अशी जगजीवन यांची ओळख आहे. आणिबाणीच्या वेळी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन जनता पार्टीत जात पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या (Morarji Desai) मंत्रिमंडळातही स्थान मिळवलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले नाहीत त्यांनी काँग्रेसचा विरोधच केला. 31 ऑक्टोबर 1984 ला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची हत्या झाल्यावर कांग्रेसने अचानक त्यांचा मुलगा राजीव गांधी (Rajiv Gandhi) याला पंतप्रधान बनवलं. राजीव गांधींना राजकारणाचा काहीच अनुभव नसताना ते थेट सत्तेच्या सर्वांत शक्तिशाली पदावर विराजित झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये राजीव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रचार सुरू केला. 24, 27 आणि 28 डिसेंबरला लोकसभेची निवडणूक झाली आणि काँग्रेसचा प्रचंड विजय झाला. पण जगजीवनराम यावर नाखूश होते. का बरं? पंडित नेहरूंच्या मार्गावरून इंदिरा झाल्या होत्या विचलित वकील आणि संविधान विशेषज्ञ एजी नूरानी यांनी आपल्या लेखात याबद्दल लिहिलंय. त्यांनी म्हटलंय कि इंदिरा गांधींनी नेहरूंपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला होता त्यामुळे सरकारमधील बहुसंख्यांकांच्या मनात असुरक्षिततेची भावना उत्पन्न झाली होती. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तशीच रणनीति ठरवली होती. त्याच वर्षी पंजाबमध्ये खालसा दहशतवाद्यांविरुद्ध सरकारने ऑपरेशन ब्लू स्टार केल्यामुळे शीखांच्या भावना दुखावल्या होत्या. निवडणुकीपूर्वीच इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर शीखविरोधी दंगे झाले होते. निवडणुकीची सूत्रं राजीव यांच्या हातांत होती. आणिबाणीच्या काळात जगजीवनरामांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला पण आणिबाणी उठल्यावर त्यांनी तातडीने काँग्रेस सोडून जनता पार्टीची सदस्यता घेतली. जेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हा जगजीवनराम म्हणाले होते, ‘हिंदू भारतासाठी हे मतदान झालं आहे.’ त्यांनी आरोप केला होता की काँग्रेसनी आनंदपूरसाहेब रिझोल्युशन मांडलं होतं आणि मुस्लिमांविरुद्ध भाषण केलं होतं. तेव्हा जगजीवनरामांचं म्हणणं हे होतं की मुस्लिमांकडे पर्यायच उपलब्ध नव्हता त्यामुळे त्यांनी काँग्रेसला मतदान केलं. नेहरूंच्या अंतरिम सरकारमधले सर्वांत तरुण मंत्री जगजीवन राम यांचा 5 एप्रिल 1908 ला भोजपूरमध्ये एका दलित कुटुंबात जन्म झाला होता. 1946 मध्ये नेहरुंच्या अंतरिम सरकारमध्ये त्यांना श्रममंत्रिपदही देण्यात आलं. ते सर्वांत कमी वयाचे मंत्री होते. घटना समितीत असलेल्या जगजीवन राम यांनी आयुष्यभर दलित आणि मागासवर्गीयांच्या उद्द्धारासाठी प्रयत्न केले. 1971 मध्ये जेव्हा भारताने युद्धात पाकिस्तानचा चारीमुंड्या चित केलं होतं तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री जगजीवनरामच होते. कृषिमंत्री असताना त्यांनी देशात हरित क्रांतीची सुरुवात केली. (हे वाचा: या' राज्याचे आरोग्य मंत्री म्हणतात, 'कोरोना नाही, मास्क वापरु नका' पाहा VIDEO   ) आणिबाणीनंतर काँग्रेसला ठोकला रामराम 1970 पासूनच जगजीवन राम यांचे इंदिरा गांधींशी खटके उडू लागले होते. 1977 मध्ये आणिबाणीनंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष काढला आणि जनता पक्षाशी युती करून निवडणूक लढवली. विजयानंतर ते पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमधअये उपपंतप्रधान झाले. 1979 मध्ये मोरारजींचं सरकार पाडून चौधरी चरणसिंह देशाचे पंतप्रधान झाले. जगजीवन रामांनी याचवर्षी काँग्रेस (जगजीवन) हा पक्ष स्थापन केला. पण ते काँग्रेसमध्ये परतले नाहीत. 1980 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर जगजीवन राम यांनी त्यांच्यावर सतत टीका केली. जगजीवन राम यांचा मृत्यु 1986 मध्ये झाला. त्यांची मुलगी मीराकुमार काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि युपीए सरकारमधअये त्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या.
  First published: