S M L

भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का?

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी हे न्यूयॉर्कला चर्चेसाठी भेटणार आहेत.

Updated On: Sep 20, 2018 05:28 PM IST

भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री न्यूयॉर्कला भेटणार, कोंडी फुटणार का?

नवी दिल्ली, ता. 20 सप्टेंबर : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी हे न्यूयॉर्कला चर्चेसाठी भेटणार आहेत. दोन परराष्ट्रमंत्र्यांची अशी भेट व्हावी अशी विनंती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती. त्याला भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या महिन्याच्या शेवटी संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री भेटणार आहेत अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही भेट होत आहे, मात्र ही दोन्ही देशांच्या चर्चेची सुरूवात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू करावी अशी विनंती केली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी न्युयॉर्क मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असंही खान यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर इम्रान खान यांनी मोदींना पाठवलेला हा चर्चेचा पहिलाच प्रस्ताव आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेदरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी यांच्यात चर्चेची सुरूवात होऊ शकते. पंतप्रधान मोदींनी सुषमा स्वराज यांना अशा चर्चेची परवानगी द्यावी अशी विनंतीही खान यांनी केलीय.

इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 ऑगस्टला इम्रान खान यांना पत्र लिहून भारताला शांतता आणि सौहार्द पाहिजे आहे अशी भावना व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून खान यांनी हे पत्र लिहिलं आहे.

2015 पासून भारत आणि पाकिस्तानमधली चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही अशी ठाम भूमिका घेत भारतानं चर्चेची दारं बंद केली होती. भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने मध्यस्ती करावी अशी विनंतीही पाकिस्तानने अमेरिकेला केली होती.

Loading...

तेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 05:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close