भारतीय वायुदलाच्या शौर्यावर पाकिस्तानी कलाकारांचं संतापजनक ट्वीट

मुस्तफाशिवाय हमजा अली अब्बासीने देखील भारत-पाकच्या या तणावपूर्ण स्थितीवर संतापजनक ट्वीट केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 02:38 PM IST

भारतीय वायुदलाच्या शौर्यावर पाकिस्तानी कलाकारांचं संतापजनक ट्वीट

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर आता पाकिस्तानी कलाकारांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.  'रईस' सिनेमामध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलेल्या माहिरा खाननेदेखील सोशल मीडियावर यासंबंधी लिहलं आहे. माहिरा म्हणाली की, 'यापेक्षा वाईट काही नाही आहे. युद्ध करण्याच्या गोष्टी म्हणजे मुर्खपणा आहे. पाकिस्तान जिंदाबाद.'तिच्या या ट्वीटवर भारतीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

माहिराने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या पत्नी आणि लेखक फातिमा भुट्टोच्या ट्वीटला उत्तर देत तिने ट्वीट केलं.

फातिमानेदेखील या India Pak Tensions वर ट्वीट केलं आहे. त्यात तिने लिहलं की, 'युद्धासाठी उत्सुक असणं म्हणजे सगळ्यात वाईट आहे.' माहिराच्या या ट्वीटवर मावरा होकेनने देखील चिंता व्यक्त केली आहे.

मावराने लिहलं की, 'आपण मानवी आयुष्याला जरा देखील महत्त्व देत असू तर युद्धात कोणीही विजयी होणार नाही. आता वेळ आली आहे प्रत्येकाला माणसांप्रमाणे समजा. देशात शांती ठेवणं हे आपलं काम आहे.'

अभिनेता मुस्तफादेखील शांती ठेवण्याचे नारे देताना दिसला.त्याने लिहलं की, 'कोण योग्य आहे हे युद्ध करून सिद्ध होणार नाही. त्यामुळे युद्धापासून लांब राहा.'

Loading...

मुस्तफाशिवाय हमजा अली अब्बासीने देखील भारत-पाकच्या या तणावपूर्ण स्थितीवर संतापजनक ट्वीट केलं आहे. त्याने लिहलं की, 'बालाकोट, वेल डन इंडिया. तुम्ही केलेला हवाई हल्ला खोटा होता. यावेळी भारतील वायूदल एलओसी पार करत आमच्या हद्दीत आली आणि बॉम्ब हल्ले करत आमची काही झाडं पाडली. पण आता यावर पाकिस्तानने कारवाई करणं महत्त्वाचं आहे.' असं संतापजनक ट्वीट हमजा अली या अभिनेत्याने केलं आहे.

संबंधित बातम्या - भारतानं पाडलेल्या F16 विमानाचा माज करतो पाकिस्तान, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्य

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

संबंधित बातम्या - VIDEO : चिठ्ठी मिळाली अन् मोदींनी अर्ध्यावरच सोडला कार्यक्रम, पाहा नेमकं काय घडलं?

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

संबंधित बातम्या - VIDEO : बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...