भारताला नाही तर रावळपिंडीला करा टार्गेट, पाकिस्तानी पत्रकाराचा इम्रान खान यांना सल्ला

भारताला नाही तर रावळपिंडीला करा टार्गेट, पाकिस्तानी पत्रकाराचा इम्रान खान यांना सल्ला

ताह सिद्दीकी हे फ्रान्समध्ये आश्रयाला असणारे पाकिस्तानी पत्रकार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पाकिस्तानमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक ठिकाणी तळ आहेत, याचा इन्कार करता येणार नाही. पाकिस्तानच्या सरकारने नुकतंच एक परिपत्रक काढलं आहे. बहावलपूरमध्ये असलेल्या 'जैश' च्या मुख्यालयाचा ताबा घेतल्याचं पाकिस्तानने यात म्हटलं आहे.

भारताने पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावर हल्ला केल्याने या दहशतवादी संघटनेचं वास्तव सगळ्यांसमोर आलं आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनीच या हल्ल्याबद्दलची बातमी सगळ्यांसमोर आणली पण पाकिस्तानने भारताचा हल्ला परतवून लावला, अशी बतावणीही पाकिस्तानने केली.

भारताच्या विमानांनी जाताजाता घाईघाईने चढाई केली, असंही पाकिस्तानने म्हटलं.  हा बॉम्बहल्ला होता, हे नंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. याचवेळी या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मद' चे तळ उद् ध्वस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले, हे भारताने जाहीर केलं.

हे दोन्ही दावे लक्षात घेतले तर सत्य कुठेतरी मध्येच आहे. भारताने जिथे हवाई हल्ला केला त्या भागात 'जैश ए मोहम्मद' चा दहशतवादी तळ होता. तो पूर्ण तळ उद्ध्वस्त झाला की नाही याबद्दल आणखी माहिती मिळण्याची गरज आहे.

हेही वाचा: ..म्हणून जगातल्या सगळ्यात वाईट वायुदलांमध्ये आहे पाकिस्तान एअरफोर्स

याआधी, लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने मुंबईवर केलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानमध्येच आखला गेला होता. भारताप्रमाणेच अफगाणिस्तान आणि इराणनेही पाकिस्तानवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा  आरोप केला आहे. इराणमधल्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे 27 जवान सुन्नी दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात मारले गेले. हा हल्ला पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या भागात झाला होता. या  सगळ्या घटना भारत, पाकिस्तान आणि पूर्ण जगालाच माहीत आहेत.

यावेळी मात्र भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बॉम्बहल्ला केला. भारताने हा हल्ला दहशतवादी तळांवर केलेला होता. तो पाकिस्तानच्या ल्षकराविरुद्ध नव्हता. तरीही पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी नॅशनल कमांड ऑथॉरिटीचा उल्लेख केला आणि पाकिस्तानकडे आण्विक हल्ल्याचा पर्याय आहे याची आठवण करून दिली. पाकिस्तानची नॅशनल कमांड ऑथॉरिटी पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावर देखरेख ठेवून आहे.

भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश झाल्य़ानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालेलं नाही. 1999 मध्ये पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं पण त्याचं पूर्ण युद्धात रूपांतर होण्याआधीच ते संपुष्टात आलं.

संबंधित बातम्या : काश्मीरमधील हा 1 फोटो सांगत आहे...भारत-पाक युद्धाची शक्यता नाकारता येत नाही!

हे दोन्ही देश आण्विक सत्ता झाल्यापासून सरकारबाह्य शक्तींनी मात्र जोर धरला आहे. अशा शक्तींनी भारताविरुद्ध युद्ध पुकारायचं आणि मग भारताच्या संभाव्य धोक्याचं कारण देत पाकिस्तानमधल्या लष्करी प्रभावाचं समर्थन करायचं, अशी रावळपिंडीची रणनीती आहे.

भारताने या दहशतवादाला प्रतिकार करण्याचा जोरदार निर्धार केला आहे. पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्याचं धोरण भारताने आखलं आहे. या हल्ल्यांमागे भारताच्या सुरक्षेचं रास्त कारण आहे.

याआधीच भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. पाकिस्तानचं लष्कर भारताच्या तुलनेत कमी प्रभावी आहे. त्यामुळे यापुढेही पाकिस्तानचा विजय होण्याची शक्यता  फारच कमी आहे.

मग या स्थितीत पाकिस्तान भारताच्या हल्ल्याला कसं उत्तर देणार ? त्यामुळेच भारत या हल्ल्याबद्दल खोटी माहिती पसरवतोय, अशी बतावणी पाकिस्तानने चालवली आहे.  भारताच्या हल्ल्याला नेमकं कसं प्रत्युत्तर द्यायचं याचं निश्चित धोरण पाकिस्तानकडे दिसत नाही.

भारताने हा हवाई हल्ला करण्याच्या दोनच वर्षं आधी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये येऊन  लष्करी तळांवर हल्ला केला होता. तिथे दहशतवाद्यांचे तळही असू शकतात. पण पाकिस्तानने त्याहीवेळी या हल्ल्याचा इन्कार केला होता.

भारताच्या या हवाई हल्ल्यात भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून  हल्ला चढवला हे पाकिस्ताने मान्य केलं. यामुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का बसलाय. म्हणूनच पाकिस्तान सरकारबाह्य शक्तींच्या आधारेच मुकाबला करेल, अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधला तणाव आणखी वाढणार आहे.

संबंधित बातम्या : ‘यामुळे पायलटला हातही लावू शकत नाही पाकिस्तानी सेना’

हा प्रश्न चिघळवण्यापेक्षा पाकिस्तानने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दहशतवादाची ही समस्या सोडवण्यासाठी पाकिस्तानने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या प्रश्नाची तीव्रता रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयातूनच वाढवली जात असेल तर लोकनियुक्त सरकारने लष्कराला जाब विचारून हे सगळं थांबवण्याची वेळ आली आहे.

दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडला आहे. भारतासोबतच अनेक देश पाकिस्तानने दहशतावादाचा प्रश्न सोडवावा म्हणून मागणी करत आहेत.  या सगळ्या गोष्टींचा पाकिस्तानने गांभिर्यानं विचार करायला हवा. त्यातच या देशाची प्रगती सामावलेली आहे. नाहीतर विनाश अटळ आहे.

ताह सिद्दीकी हे फ्रान्समध्ये आश्रयाला असणारे पाकिस्तानी पत्रकार आहेत.

VIDEO: दिल्ली विमानतळावर सैनिकांचं आगमन होताच नागरिकांनी दिली 'अशी' सलामी

First published: February 27, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading