Home /News /news /

धक्कादायक! कोरोनाने जग हादरलंय आणि असे 1500 व्हायरस चीनने ठेवले होते एकत्र?

धक्कादायक! कोरोनाने जग हादरलंय आणि असे 1500 व्हायरस चीनने ठेवले होते एकत्र?

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 26 मार्च : जगाला ठप्प करणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना व्हायरसचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. चीनमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर जगभरात हा व्हायरस पोहोचला. यामुळे आतापर्यंत जगात 20 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस चीननेच तयार केला असा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला आहे. जगभरातून कोरोनामुळे चीनवर टीका केली जात आहे. त्यातच आता भारतातही राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी गंभीर आरोप चीनवर केला आहे. त्यांनी चीनच्या सरकारी वृत्तपत्राच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यानुसार चीनच्या हुबेईमध्ये 1500 पेक्षा जास्त व्हायरस स्ट्रेन एका व्हायरस बँकेत ठेवल्याचं म्हटलं आहे. राकेश सिन्हा यांनी चीनचं सरकारी वृत्तपत्र चायना डेलीचा जुना फोटो शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, चीनने जगाला संकटात टाकलं. ज्या डॉक्टरने कोरोनाबद्दल देशासह जगाला सर्वात आधी सांगितलं त्यालाही मारून टाकलं. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा दिखावा केला आणि आता जगभरात चीनची मदत घेणाऱ्या देशांचं सहाय्य घेऊन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात भारतही अपवाद नाही. शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये म्हटलं आहे की, चीनमध्ये आशियातील सर्वात मोठी व्हायरस बँक आहे. ज्यामध्ये 1500 पेक्षा जास्त व्हायरस स्ट्रेन ठेवण्यात आले होते. याआधीही चीनवर आरोप करण्यात आले आहेत की त्यांनी व्हायरसची लागण झाल्याची माहिती लपवून ठेवली. पहिल्यांदा याची माहिती देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर चीनवर प्रश्नांचा भडिमार केला गेला. चीनवर होत असलेल्या आरोपनानंतर त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी कोरोना व्हायरसला चिनी व्हायरस असं म्हटलं जात आहे त्याला भारतानं विरोध करावा असं सांगितलं होतं. यावर एस जयशंकर यांनी स्पष्ट काहीही वक्तव्य केलं नव्हतं. हे वाचा : मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या युवकाचा कोरोनाने मृत्यू, देशांमधल्या मृतांमध्ये सगळ्
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या