भारतीय हवामान खात्याचा इशारा, पुढच्या 24 तासांत वाढणार थंडीचा कडाका

भारतीय हवामान खात्याचा इशारा, पुढच्या 24 तासांत वाढणार थंडीचा कडाका

23 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाडा, विदर्भात तुरळक प्रमाण पाऊस होण्याची शक्यता आहे तर 24 डिसेंबरला गोव्यासह मराठवाड्यात कोरडे वातावरण असेल

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर : उत्तर भारतात (North India) कडाक्याच्या थंडीने दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड आणि पूर्व उत्तर प्रदेश या भागात दाट धुके राहील, असे भारतीय हवामान खात्याने म्हटलं आहे. तसंच, हवामान खात्याने (India Meteorological Department) 25 डिसेंबरनंतर थंडी अधित वाढण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील हवामानाचा अंदाज

23 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठवाडा, विदर्भात तुरळक प्रमाण पाऊस होण्याची शक्यता आहे तर 24 डिसेंबरला गोव्यासह मराठवाड्यात कोरडे वातावरण असेल तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 26 डिसेंबरला गोव्यासह संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

उत्तर भारतात वेळे आधीच हिवाळा दाखल झाला होता. भर दिवसाही कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 10 वर्षात संपूर्ण डिसेंबरमध्ये सर्वाधिक 8 दिवस कोल्ड वेव्ह उत्तर भारतात होते. त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात तापमान 15 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहणार नाही. तसेच, दाट धुक्यामुळे पुढील तीन दिवस लोकांच्या समस्या वाढतील.

हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, 2 डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडी वाढू शकते. पंजाब, हरियाणा, चंदीगड येथे सकाळी काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता आहे. त्याशिवाय दुसर्‍या दिवशी - पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये थंड हवामान तीव्र होऊ शकते, असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

पर्वतरांगांवर अकाली हिमवृष्टीमुळे दिल्लीला वेळेच्या दहा दिवस अगोदर थंडीचा तडाखा बसला. 16 डिसेंबरपासून लोकांना थंडीचा त्रास होऊ लागला याहे. रविवारी बर्‍यापैकी वार्‍यामुळे तापमान पुन्हा खाली आले.

कमाल तापमान केवळ 14.6 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी गेले. ते सामान्यपेक्षा 7 अंश सेल्सिअस होते. मंगेशपूरमध्ये कमाल तापमान फक्त 12 अंश सेल्सिअस, डीयूमध्ये 12.6 डिग्री, पुसामध्ये 12.2 डिग्री, जाफरपुरात 12.9 डिग्री आणि रिजमध्ये 13 अंश होते. किमान तापमानही 7.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी दाट धुके राहील. कमाल तापमान फक्त 15 अंश सेल्सिअस राहील. 26 डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहणार असून कमाल तापमान फक्त 14 ते 15 डिग्री सेल्सिअस राहील. परंतु मंगळवारपासून किमान तापमानात घसरण होईल आणि बुधवारी ते जवळपास 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.

26 डिसेंबरनंतर तापमानात कोणतीही वाढ होणार नाही. तर, 26 डिसेंबरनंतर धुक्यांपासून थोडा आराम मिळू शकेल. आणि ते मध्यम डिग्रीपर्यंत पोहोचू शकते. पण 28 डिसेंबरपर्यंत थंडीचा प्रादुर्भाव कायम राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 03:21 PM IST

ताज्या बातम्या