दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा दारूण पराभव, दक्षिण आफ्रिकेनं 2-0 ने मालिकाही जिंकली

दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा दारूण पराभव, दक्षिण आफ्रिकेनं 2-0 ने मालिकाही जिंकली

दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारताचा 135 धावांनी दारून पराभव केलाय. दक्षिण आफ्रिकेच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 151 धावांवर गुंडाळला. सलग दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

  • Share this:

17 जानेवारी, सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारताचा 135 धावांनी दारून पराभव केलाय. दक्षिण आफ्रिकेच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 151 धावांवर गुंडाळला. सलग दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेनं तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दुस-या डावात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून एन्गिडीने सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सहा विकेट घेतल्या. रबाडाने तीन गडी बाद करुन त्याला चांगली साथ दिली. आज कसोटीचा अखेरचा दिवस होता. कालच्या 3 बाद 35 वरुन आज सकाळी डाव पुढे सुरु झाल्यानंतर भारताला चेतेश्वर पूजार आणि पार्थिव पटेलच्या रुपाने आणखी दोन धक्के बसले.

चेतेश्वर पूजारा (19) धावांवर धावबाद झाला तर पार्थिव पटेलला (19) धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. 65 धावात भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. भारताला विजयासाठी 287 धावांचे टार्गेट मिळाले होते. पण भारताचा दुसरा डाव 151 धावांवरच आटोपला.

First published: January 17, 2018, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading