नवी दिल्ली, 15 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. अशात आता अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा देश आहे जिथे दररोज दहा हजारहून अधिक कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे 12 हजार रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर, नजर टाकली तर या महिन्यात भारतात सुमारे दहा हजार प्रकरणं समोर आली आहेत. तर अमेरिकेत ही संख्या 22,322 आणि ब्राझीलमध्ये 25800 होती. दिवसेंदिवस नवीन प्रकरणांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंताही वाढली आहे.
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी ही अमेरिकेतील अशी शहरं आहेत जिथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोट्यवधी प्रकरणं इथे नोंदवली गेली आहेत. न्यूयॉर्कच्या, न्यूजर्सीमध्ये 30,874 लोकांना कोरोना झाला तर 12,696, लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दोन महिन्यांत परिस्थिती इतकी बिकट झाली होती की रुग्णालयात जागाच नव्हती, लोकांच्या घरातदेखील उपचार केले जात होते.
दिल्ली-मुंबईमध्ये रुग्ण बरी होण्याची संख्या जास्त
मिळालेल्या माहितीनुसार, वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत एक दिलासादायक बातमी म्हणजे, कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्यादेखील वाढत आहे. जगातील बऱ्याच शहरांमध्ये दिल्ली-मुंबईतील रिकव्हरीचं प्रमाण अजूनही सर्वात जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये केवळ 21.23 टक्के, तर न्यूजर्सीमध्ये केवळ 18.88 टक्के साथीच्या आजारातून बरे झाले आहेत. इतकंच नाही तर तिथले लोक कित्येक महिन्यांपासून या आजाराने ग्रस्त आहेत. त्याचवेळी मुंबईत 45.65 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली तर दिल्लीत 38.36 टक्के लोकांचं आरोग्य चांगलं आहे.
न्यूयॉर्कपेक्षा दिल्ली-मुंबईमध्ये कोरोनाची जास्त प्रकरणं
राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईमत कोरोना संक्रमणाचा आकडा अमेरिकेच्या बऱ्याच शहरांपेक्षा मोठा आहे. एकेकाळी जगातील सर्वाधिक प्रभावित शहरं असलेल्या न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये दिवसाला फक्त 500-600 प्रकरणं नोंदवली जात होती तर दिल्लीत ही संख्या 2100 आणि मुंबईत 1500 वर नोंदवली गेली आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona