रॅनसमवेअर व्हायरस हल्ल्याचा भारतावर जास्त प्रभाव, एटीएम मशीनला कमी धोका

रॅनसमवेअर व्हायरस हल्ल्याचा भारतावर जास्त प्रभाव, एटीएम मशीनला कमी धोका

भारत हा यातील सर्वात प्रभावित देश असल्याची माहिती राज्याचे सायबर क्राईमचे पोलीस महासंचालक ब्रजेश सिंग यांनी दिली आहे.

  • Share this:

17 मे : रॅनसमवेअर या व्हायरसने जगातील 100 पेक्षा अधिक देशांत धुमाकूळ घातलाय.  भारत हा यातील सर्वात प्रभावित देश असल्याची माहिती राज्याचे सायबर क्राईमचे पोलीस महासंचालक ब्रजेश सिंग यांनी दिली आहे.

हा व्हाॅयरस ऑनलाईन खंडणी असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉम्प्युटर वापरणाऱ्या सर्वांनी अँटी व्हायरस अपडेट करून घ्यावेत अशी सूचनाही देण्यात आलीय. ज्यांच्या कॉम्प्युटरमध्ये रॅनसमवेअर हा व्हायरस आला असेल त्यांनी आपलं कॉम्प्युटर्स तातडीने फॉरमॅट करून घ्यावेत आणि कोणत्याही प्रकारची रक्कम bitcon च्या अकाउंट भरू नये असं आवाहनही सिंग यांनी केलं.

बँकांचे एटीएम थेट कॉम्प्युटर्सला अॅटॅज नसल्यानं या व्हायरसचा धोका एटीएमना कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच रॅनसमवेअर व्हायरसमुळे मोबाईल प्रभावित झाल्याची अजून एकही घटना समोर आली नसल्याचीही माहिती ही सिंग यांनी दिली.

सायबर हल्ला झाल्यास काय उपाययोजना कराव्यात?

- अनोळख्या व्यक्तीकडून आलेले मेल तसंच लिंक, अटॅच फाईल उघडू नये

- अविश्वासनीय वेबसाईट्सवरून चित्रपट, गाणी, फाईल्स डाऊनलोड करू नये

- सीडी, युएसबी आयटी व्हेरीफाईड कॉम्युटरलाच जोडा

- ओपन वायफाय किंव्हा हॉटस्पॉटला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्युटर जोडू नका

- हॅकर्स या ओपन वायफाय किंवा हॉटस्पॉटचा वापर करून माहिती चोरू शकतात

- अपडेटेड अँटीव्हायरसच वापरा

- कोणताही अॅलर्ट आल्यास त्याबाबतची माहिती आयटी तज्ज्ञांना द्या

 

First published: May 17, 2017, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading