S M L

पुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प ?

भारतानं प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे.

Updated On: Jul 13, 2018 04:24 PM IST

पुढील वर्षी राजपथावर येणार डोनाल्ड ट्रम्प ?

नवी दिल्ली, 13 जुलै : पुढील वर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन भारतासाठी खास ठरण्याची शक्यता आहे. भारतानं प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे. ट्रम्प यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारल्यास ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं यश असेल, असं मानलं जात आहे.

VIDEO : मॉक ड्रिल करताना ट्रेनरने दुसऱ्या मजल्यावरून दिला धक्का, विद्यार्थिनीचा मृत्यू

भारताकडून ट्रम्प यांना निमंत्रित केल्याची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या सूत्रांनी दिलीये. यावर्षी एप्रिलमध्ये भारतानं ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, त्यावर अमेरिकेकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भारताच्या निमंत्रणावर ट्रम्प प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारल्यास भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे मोठं यश असेल, असं बोललं जात आहे. याआधी २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या पोलिसाने महिलेकडे केली मिठी मारण्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 04:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close