Home /News /news /

बजेटनंतर मोदी सरकारला मोठा धक्का, GDP बद्दलचा दावा आंतरराष्ट्रीय संस्थेने ठरवला खोटा

बजेटनंतर मोदी सरकारला मोठा धक्का, GDP बद्दलचा दावा आंतरराष्ट्रीय संस्थेने ठरवला खोटा

बजेटच्या आधी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारताचा GDP 6 ते 6.5 टक्के राहील, असं म्हटलं आहे पण या संस्थेने वर्तवलेला अंदाज त्यापेक्षा कमी आहे. या संस्थेने 5.6 टक्क्यांचा अंदाज केला आहे.

    नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं आहेत. मंदीसदृश स्थितीतून अर्थव्यवस्था बाहेर येतेय, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यातच आता भारताचा GDP 5.6 टक्के होईल, असा अंदाज फिच रेटिंग्ज या संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दलची चिंता कमी झालेली नाही. बजेटच्या आधी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारताचा GDP 6 ते 6.5 टक्के राहील, असं म्हटलं आहे पण या संस्थेने वर्तवलेला अंदाज त्यापेक्षा कमी आहे. या संस्थेने 5.6 टक्क्यांचा अंदाज केला आहे. सरकारने अर्थसंकल्पात (Indian Economy) अशी कोणतीही घोषणा केलेली नाही ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तेजीत येईल, असं फिच या रेटिंग एजन्सीचं म्हणणं आहे. सरकारवर GDP चं 70 टक्के कर्ज फिच रेटिंग्जचे थॉमस रुकमाकर यांच्या मते, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 3 वर्षं वित्तीय तूट कमी करण्यात अपयशी ठरल्या. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात ही वित्तीय तूट 3.5 टक्क्यांवर ठेवण्याचं लक्ष्य आहे. (हेही वाचा : VIDEO : दिल्लीच्या रोड शो मध्ये गृहमंत्री अमित शहांनी उंचावली तलवार) आर्थिक पाहणी अहवालात GDP वाढीसाठी काही उपाय केल्याचं म्हटल्याचं आहे. इनकम टॅक्समध्ये कपात, परदेशी गुंतवणुकीवर जोर, संरचनात्मक कामामधली गुंतवणूक आणि काही योजनांमुळे आर्थिक वाढीला वेग येऊ शकतो. भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्सटाइल क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करतंय. यामुळे GDP वाढेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. टॅक्सकपातीचा महसुलावर परिणाम मागच्या वर्षी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात आणि यावर्षी इनकम टॅक्समध्ये कपात यामुळे एकूण महसुलावर कमी काळात परिणाम होऊ शकतो. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताची आर्थिक वाढ 4.5 टक्क्यांवर पोहोचलीय. ही वाढ गेल्या 11 वर्षांतली नीचांकी वाढ आहे. त्यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं तशीच आहेत. ======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: GDP, Indian economy

    पुढील बातम्या