देशातील सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

ईशान्य भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांदरम्यान बांधण्यात आलेल्या ढोला-सादिया सेतू या भारतातील सर्वात लांब पुलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 26, 2017 01:25 PM IST

देशातील सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

26 मे : ईशान्य भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांदरम्यान बांधण्यात आलेल्या ढोला-सादिया सेतू या भारतातील सर्वात लांब पुलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेल्या लोहित नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील दळणवळण अधिक सुकर होणार असून, सामरिकदृष्ट्याही हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल बांधण्यापूर्वी पूर्व अरुणाचल प्रदेशमधील अंजॉ येथून आसाममधील तिनसुखियाला जाण्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागत होता. आता या पुलामुळे हा कालावधी तब्बल पाच तासांनी कमी होणार आहे. या पुलामुळे लष्करालाही सीमावर्ती भागात मनुष्यबळ, तसेच शस्त्रसाठा आणि अन्य वस्तू पुरवण्यासाठी सहाय्य होणार आहे. अरुणाचल प्रदेशच्या चीनला लागून असलेल्या सीमेजवळ हा पूल आहे.

आसाममधल्या ढोला आणि अरुणाचलमधल्या सदिया यांना जोडणारा हा पूल पूर्वोत्तर राज्यांसाठी जणू दळणवळण क्रांतीच ठरणार आहे. सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 तासांचा प्रवास करावा लागतो तो आता केवळ 1 तासावर येणार आहे. शिवाय 165 किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा सरकारचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...