संघात परतण्यासाठी धोनीची तयारी सुरू, VIDEO VIRAL

वर्ल्ड कपनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्ध संघ जाहीर करताना निवड समितीनेही धोनीला सूचक इशारा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 09:42 AM IST

संघात परतण्यासाठी धोनीची तयारी सुरू, VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसलेला नाही. विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धच्या संघातही धोनी नाही. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, धोनी आफ्रिकेविरुद्धच्या रांचीतील कसोटी सामन्यावेळी खेळाडूंना भेटला. त्यानंतर आता तो पुनरागमनासाठी तयारी करत आहे.

धोनी झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या जिममध्ये घाम गाळत आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. धोनी सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. झारखंड संघाकडून कमबॅक करण्यासाठी धोनीनं ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. जानेवारी 2020मध्ये धोनी सैयद अली स्पर्धेत खेळण्यास सुरुवात करणार आहे. झारखंडच्या वरिष्ठ संघात धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यासाठी धोनी आतापासून राज्य अंडर-23 संघाकडून अभ्यास वर्गाला सुरुवात केली आहे.

भारतीय संघ बांगलादेशनंतर मायदेशातच विंडिजविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारीत मालिका होणार आहे. भारतात होणाऱ्या या मालिकांनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. याआधी लंकेविरुद्ध किंवा न्यूझीलंडविरुद्ध धोनी संघात दिसण्याची शक्यता आहे.

Loading...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीची निवड झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. यामध्ये धोनीचे नाव नसल्याने पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला आहे. बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आलं. तेव्हा प्रसाद यांनी म्हटलं की, आता धोनीच्या पलिकडं विचार करायला हवा. यापुढे ऋषभ पंतला संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, अखेर धोनीच्या कमबॅकची तारीख ठरली

बांगालदेशविरुद्ध धोनी पुनरागमन करेल असं म्हटलं जात होतं पण असं झालं नाही. प्रसाद यांना विचारण्यात आलं की धोनीला संघातून बाहेर काढलं आहे का? यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की, वर्ल्ड कपनंतर स्पष्ट केलं होतं की आम्ही आता पुढचा विचार करत आहे. युवा खेळाडूंना संधी देत आहोत आणि ते स्वत:ला सिद्ध करू शकतील. सध्या पंत आणि संजू सॅमसन संघात आले आहेत. मला विश्वास आहे की तुम्ही आमचं म्हणणं समजून घेत असाल. प्रसाद म्हणाले की, युवा खेळाडूंना संधी देण्याच्या निवड समितीच्या मताशी धोनीदेखील सहमत आहे. आमची धोनीशी चर्चा झाली असून त्यानंही निवड समितीचा हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.

video: ... तर सचिन कधी क्रिकेट खेळू शकला नसता; स्वत: केला मोठा खुलासा!

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 09:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...