मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

खूपच वाईट होता लॉकाडाऊनचा चौथा टप्पा, प्रत्येक तासाची रुग्णांची आकडेवारी वाचून हादराल

खूपच वाईट होता लॉकाडाऊनचा चौथा टप्पा, प्रत्येक तासाची रुग्णांची आकडेवारी वाचून हादराल

सुमारे 100 वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या दुसर्‍या टप्प्यात कोट्यवधी लोकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली होती. स्पॅनिश फ्लूही कोव्हिडप्रमाणेच होता. त्यावेळीही उन्हाळ्यात आजाराची प्रकरणं कमी होती, परंतु नंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

सुमारे 100 वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या दुसर्‍या टप्प्यात कोट्यवधी लोकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली होती. स्पॅनिश फ्लूही कोव्हिडप्रमाणेच होता. त्यावेळीही उन्हाळ्यात आजाराची प्रकरणं कमी होती, परंतु नंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

गेल्या एका आठवड्यात, दररोज नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आता भारतात एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 31 मे : लॉकडाऊन (Lockdown 4) च्या चौथ्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे. यादरम्यानच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर लॉकडाऊनचा चौथा टप्पा खूप वाईट होता. यावेळी, दर तासाला कोरोनाचे सरासरी 271 नवीन रुग्ण आढळले. गेल्या एका आठवड्यात, दररोज नवीन कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आता भारतात एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 142 झाली आहे.

दर तासाला 271

भारतात 16 मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपला. त्यावेळी देशातील एकूण रुग्णांची संख्या 90,927 होती. पण आता एकूण रूग्णांची संख्या 1,82,142 झाली आहे. म्हणजेच लॉकडाऊन 4 मध्ये रुग्णांची संख्या दुप्पट झाली. दर तासाला सरासरी 271 नवीन रुग्ण आढळतात.

गेल्या 6 दिवसांत वाढली प्रकरणं

लॉकडाऊनचे शेवटचे 6 दिवस खूप वाईट होते. 24 मे रोजी 6767 नवीन रुग्ण समोर आले. 25 मे रोजी ते 6977 पर्यंत वाढले. 28 मे रोजी ते 7466 वर पोहोचले. रविवारी 8380 नवीन प्रकरणे आढळली आणि शनिवारी हा आकडा 7965 होता.

राज्यातून रेड, ग्रीन झोन होणार गायब; संध्याकाळी ठरणार लॉकडाऊनच्या मागचं भविष्य

रुग्ण बरे होण्याचा दर वाढला

या सगळ्यात दिलासा देणारी एक बाब म्हणजे भारतात रुग्ण वाढण्याचा दरही सतत वाढत आहे. हा रिकव्हरी रेट 47.75 वर पोहोचला आहे. जेव्हा देशात पहिला लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा त्यावेळेस रूग्णांच्या बरं होण्याचा दर 7.1% होता. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तो 11.42% पर्यंत पोहोचला. यानंतर तो दर आणखी वाढला आणि 26.59 टक्क्यांवर पोहोचला. 18 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा ही संख्या 38% पर्यंत पोहोचली.

कोरोनाने आजही गाठला सर्वाधिक रुग्णांचा आकडा, 24 तासांत 8 हजारांहून अधिक रुग्ण

रुग्णांची संख्या वाढली

देशात रविवारी एका दिवशी कोरोना संक्रमणाचे सर्वाधिक 8,380 नवीन रुग्ण समोर आले. त्यामुळे कोरोनाचा एकूण आकडा 1,82,143 वर गेला आहे, तर मृतांचा आकडा 5,164 झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते देशातील 89,995 लोकांना अद्याप कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर 86,983 लोक बरे झाले आहेत आणि एक रुग्ण परदेशात गेला आहे. आतापर्यंत सुमारे 47.75 टक्के रुग्ण निरोगी झाले आहेत.

कोरोनापेक्षाही मोठं संकट, तब्बल 7 लाख दुकानं बंद होण्याच्या मार्गावर

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Corona