मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भारतात 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, आता गाझियाबादमध्ये आढळला आणखी एक रुग्ण

भारतात 'कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, आता गाझियाबादमध्ये आढळला आणखी एक रुग्ण

गाझियाबादमध्ये (Ghaziabad) आणखी एक रुग्ण आढळल्यानंतर भारतातील कोरोनाग्रस्त (India coronavirus patient) रुग्णांची एकूण संख्या 30 झाली आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 05 मार्च : भारतात (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांची संख्या आता वाढली आहे, गाझियाबादमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीसवर पोहोचली आहे. त्यामुळे भारताचा धोका वाढला आहे.

गाझियाबादमधील (Ghaziabad) ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच इराणहून भारतात परतली. मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण गाझियाबादच्या राजनगर एक्सटेन्शमध्ये राहणारा आहे. त्याला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भारतात सर्वात आधी केरळमध्ये 3 रुग्ण आढळून आले होते, जे बरे झालेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यानंतर दिल्ली आणि एनसीआरमध्ये 3 रुग्ण आढळले (दोघं इटलीहून आणि एक इराणहून आला). दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.

हे वाचा - Coronavirus चा कहर! सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद, सरकारचा निर्णय

दरम्यान केंद्र सरकार या परिस्थितीशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व परिस्थितीवर स्वत:लक्ष ठेवून आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकसभेत दिली.

शिवाय कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात. ऑफिसमधील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बेल्जिअम दौराही रद्द करण्यात आला आहे.

हे वाचा - जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का?

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus in india, Symptoms of coronavirus