Home /News /news /

India-China Tension: राजनाथ सिंह यांचा चीनला मोठा इशारा, म्हणाले - कुठल्याही थराला जावू

India-China Tension: राजनाथ सिंह यांचा चीनला मोठा इशारा, म्हणाले - कुठल्याही थराला जावू

चीनच्या कुरापती अशाच सुरू राहिल्या तर भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे असा इशारा यावेळी त्यांनी चीनला दिला.

    नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) इथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीला सहभागी झालेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चिनी समकक्ष जनरल वेई फेंघे (General Wei Fenghe) यांच्याशी पूर्व लडाखमधील तणावाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या वादाला चीनी सैनिकांची आक्रमक वृत्ती हे एकमेव कारण असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. चीनच्या कुरापती अशाच सुरू राहिल्या तर भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे असा इशारा यावेळी त्यांनी चीनला दिला. संरक्षण मंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 'भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान कठोर इशारा दिला आहे. आक्रमक चिनी सैन्यामुळे पूर्व लडाखमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वागण्याचे परिणाम आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केलं तर भारत कठोर पाऊल उचलण्यास तयार आहे.' मजुरांनी भरलेल्या बसला भरधाव ट्रकने चिरडलं, काळजाचं पाणी करणारे अपघाताचे PHOTOS भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्री यांच्यात झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारत सीमा रक्षणासाठी जबाबदारी बजावत आहे आणि बजावत राहील, असं राजनाथ यांनी सांगितलं आहे. भारत आणि भारतीय सैन्य आपल्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर कधीही तडजोड करणार नाही. भारतीय सैनिकांची वृत्ती सीमा व्यवस्थापनाबाबत नेहमीच जबाबदार राहिली आहे. पण आमच्या भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो. 24 तासांत रिकव्हरी दरानं मोडले सगळे रॅकॉर्ड, 5 राज्यांत रुग्णसंख्या झाली कमी आक्रमक वृत्ती सोडण्याचा चीनला दिला सल्ला जर चीनला भारताशी चांगले संबंध हवे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थिरता आणावी लागेल. परस्पर मतभेदामुळे वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात चीनला शांतपणेच वागावं लागेल. आपल्या नेत्यांमध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांच्या सैन्याने पावलं उचलली पाहिजेत. भारत-चीन सीमेवर द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापसातील मतभेद वादाचे स्वरूप बनवू नये.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या