चीनची हिम्मत वाढली! पुन्हा एकदा केला घुसखोरी करण्याचा प्रयत्न, भारतीय सैन्याने उधळला कट

चीनची हिम्मत वाढली! पुन्हा एकदा केला घुसखोरी करण्याचा प्रयत्न, भारतीय सैन्याने उधळला कट

सोमवारी रात्री पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली आहे. एकीकडे चर्चा करत दुसरीकडे घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्ट रोजी चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला.

जेव्हा दोन देशांमधील ब्रिगेड कमांडर्स चुसुल आणि मोल्दो इथे फ्लॅग बैठक सुरू असतानाच घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ही दोन्ही सैन्य टँक आणि इतर जड शस्त्रं घेऊन एकमेकांच्या समोर उभी आहेत. ताणतणाव कमी करण्यासाठी तासनतास चाललेल्या या बैठकीचा अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही.

दरम्यान, मुजोर चीनची दादागिरी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून उल्लंघन होत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. गॅलव्हान खोऱ्यानंतर लडाखमध्ये तणाव निर्माण झाला होता. 29 ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने होतं.

चीननं भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावला होता. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पीएलएच्या सैनिकांनी शिखरावर चढून भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी त्यांना इशारा देताच ते मागे झाले. फ्लॅग बैठकीदरम्यानही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण यावर सकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 2, 2020, 7:20 AM IST

ताज्या बातम्या