Home /News /news /

भारतीय दिग्दर्शिकेचा श्रीलंकेतला सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; पण कॅनडाची अधिकृत एंट्री म्हणून

भारतीय दिग्दर्शिकेचा श्रीलंकेतला सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; पण कॅनडाची अधिकृत एंट्री म्हणून

मूळच्या भारतीय वंशाच्या दिग्दर्शिका दीपा मेहता यांचा सिनेमा दुसऱ्यांना ऑस्करवारीत आहे.

    टोरांटो, 31 ऑक्टोबर : भारतीय वंशाच्या दिग्दर्शिका दीपा मेहता यांचा फनी बॉय हा चित्रपट या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यातीत आहे. पण हा चित्रपट भारतातून नव्हे तर कॅनडातून अधिकृत एंट्री म्हणून निवडला गेला आहे. फायर, वॉटर या चित्रपटांमुळे वादात सापडलेल्या दीपा मेहता या कॅनडाच्या नागरिक आहेत. आता त्यांना फनी बॉय हा चित्रपट कॅनडाची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून नामांकित झाला आहे. 2007 मध्ये दीपा मेहतांचा वॉटर ऑस्करसाठी पाठवला गेला होता. वॉटरचं चित्रिकरण मेहता भारतात करणार होत्या. पण वाराणशीत त्यांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. समलिंगी संबंध दाखवणाऱ्या फायर चित्रपटावरून गदारोळ उठला होता. त्यामुळे अखेर त्यांना वॉटरचं शूटिंग श्रीलंकेत करावं लागलं. फनी बॉय या चित्रपटाचं शूटिंगही दीपा मेहतांनी श्रीलंकेतच केलं आहे. श्याम सेल्वादुराई यांच्या 1994 मध्ये लिहिलेल्या फनी बॉय या कादंबरीवर चित्रपट आधारित आहे. एका पौगंडावस्थेतल्या मुलाला सेक्शुएलिटीची जाणीव होते असाच विषय यात आहे. आपल्याच वर्गातल्या दुसरा मुलाकडे तो आकर्षित होतो, अशी ही कथा आहे. तमीळ- सिंहलींच्या वांशिक संघर्षाची आणि लंकेच्या सिव्हिल वॉरची पार्श्वभूमी या कथेला आहे. "माझ्यासाठी फनी बॉय म्हणजे मानवतावाद आणि आशेची गोष्ट आहे", असं दीपा मेहता म्हणाल्या. ऑस्करच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय विभागासाठी आतापर्यंत 25 देशांकडून एंट्री आल्या आहेत. यातल्या 5 चित्रपटांची निवड अॅकॅडमी अवॉर्डच्या शेवटच्या टप्प्यात होईल. यातल्याच एकाला ऑस्करची बाहुली मिळेल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या