S M L

रतन टाटा यांनी केलं भारतीय वायुदलाचं कौतुक, मोदींना म्हणाले...!

'पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला करून आपण ती उद्ध्वस्त केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचं अभिनंदन.'

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 03:01 PM IST

रतन टाटा यांनी केलं भारतीय वायुदलाचं कौतुक, मोदींना म्हणाले...!

मुंबई, 27 फेब्रुवारी : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी भारतीय वायुदलाला (Indian Air Force)शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय वायुदलाने मंगळवारी सीमारेषा ओलांडत पाक व्याप्त काश्मीरच्या बालाकोटमध्ये मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची अनेक तळं उद्ध्वस्त केली. यावर रतन टाटा यांनी भारतीय वायुदलाचं कौतुक केलं आहे.

रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील कौतुक केलं. यासंदर्भात रतन टाटा यांनी ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला करून आपण ती उद्ध्वस्त केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचं अभिनंदन. आपल्या देशात दहशतवादी नाहीत असा दावा वारंवार पाकिस्तानकडून करण्यात आला. पण पुलवामा हल्ल्याचं चोख उत्तर भारतीय वायुसेनेनं दिलं याबद्दल मला गर्व आहे.'



Loading...

संबंधित बातम्या - भारतानं पाडलेल्या F16 विमानाचा माज करतो पाकिस्तान, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्य

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

संबंधित बातम्या - VIDEO : चिठ्ठी मिळाली अन् मोदींनी अर्ध्यावरच सोडला कार्यक्रम, पाहा नेमकं काय घडलं?

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

संबंधित बातम्या - VIDEO : बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.


VIDEO: दिल्ली विमानतळावर सैनिकांचं आगमन होताच नागरिकांनी दिली 'अशी' सलामी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 03:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close