मुंबई, 30 जुलै : मराठा सामाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्यांवर आज काँग्रेस, एनसीपी आणि शिवेसेना पक्षांच्या आमदारांची बैठक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बोलवलीय. काँग्रेस आमदारांची बैठक विधीमंडळात दुपारी १२ वाजता होणार आहे. तर त्याचवेळी एनसीपी आमदारांची बैठक दुपारी १२ वाजता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे. या बैठकीनंतर पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. विद्यासागरराव आणि राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. तर एनसीपी बैठकीत अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे शिवेसना आमदारांची बैठक ही शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत आहे.
मराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुपारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर ही बैठक होणार आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय.
त्यामुळे आता या सर्व बैठकांतून आता काय साध्य होणार आहे. यातून आरक्षणावर काही तोडगा निघणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या आंदोलनादरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक आमदार आणि खासदारांनी आरक्षणा मिळाव यासाठी आपला राजीनामा दिला. त्यामुळे त्याकवरही काही निर्णय होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
हेही वाचा...
'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा