इंदापूरमधून धक्कादायक बातमी, राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नी-मुलीला कोरोनाची लागण

इंदापूरमधून धक्कादायक बातमी, राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नी-मुलीला कोरोनाची लागण

जर कुणी संपर्कात आले असेल तर त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा आरोग्य प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Share this:

मधुकर गलांडे, प्रतिनिधी

इंदापूर, 24 ऑगस्ट :  महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे निवडून आलेले  आमदार यशवंत माने यांना कोरोनाची लागण झाली आहे. यशवंत माने हे मुळचे इंदापूरचे आहे. यशवंत माने यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि घरच्या सदस्यांची यादी करण्यात आली आहे. तसंच जर कुणी संपर्कात आले असेल तर त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा आरोग्य प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन माने यांच्याकडून करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांनी सादर केला राजीनामा, मनमोहन सिंग यांच्याकडे केली मोठी मागणी

त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी आणि सोळा वर्षाच्या मुलीसह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  सध्या आमदार माने यांचे कुटुंब हे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तर स्वीय सहाय्यक इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील कोविड रुगाणालयात उपचार घेत आहेत.  यावेळी, 'माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी प्रकृती उत्तम आहे. सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी. वेळीच तपासणी करावी,' असा सल्ला आमदार माने यांनी दिला.

राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या 7 लाख गाठणार

दरम्यान, राज्यात रविवारी 10,441 नवे रुग्ण आढळून आलेत तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 6,82,383 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 4,88,271 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1,71,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 एवढा झाला आहे. तर मृत्यू दर हा 3.26 एवढा आहे.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 2:11 PM IST
Tags: indapurNCP

ताज्या बातम्या