विराट-शास्त्रींनी का घेतलं नाही रोहितला संघात? रहाणेनं केला खुलासा

विराट-शास्त्रींनी का घेतलं नाही रोहितला संघात? रहाणेनं केला खुलासा

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांना वगळलं आहे.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अश्विनला संघात न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 23 ऑगस्ट : भारताने विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटत दिवसअखेर 6 बाद 203 धावा केल्या. भारताची आघाडीची फळी पहिल्या डावात अपयशी ठरली. पहिले तीन फलंदाज 25 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं डाव सावरला. त्यानं संयमानं फलंदाजी करत अर्धशतक केलं. याशिवाय संघाला 200 धावांचा टप्पा पार करू दिला. त्याने 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

दरम्यान, भारताने पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनला संधी दिली नाही. त्यांच्या जागी हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजाची वर्णी लागली. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अश्विनला संघात न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अजिंक्य रहाणेनं रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना संघात का घेतलं नाही याचा खुलासा केला आहे.

पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर रहाणे म्हणाला की, सामन्याची परिस्थिती पाहून संघाने रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गरजा पाहून घेण्यात आला आहे. जेव्हा अश्विनसारख्या खेळा़डूला बाहेर बसवलं जातं तेव्हा निर्णय सोपा नसतो. मात्र संघ व्यवस्थापनाला संघाचे संतुलन साधायचं असतं.

जडेजाला संघात घेण्यात आलं कारण तो योग्य पर्याय ठरू शकतो. अष्टपैलू असलेला जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तसेच हनुमा विहारी पर्यायी गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडू शकतो. त्यामुळं प्रशिक्षक आणि कर्णधारांनी हा निर्णय घेतला आहे. रोहित आणि अश्विनसारख्या खेळाडूंना बाहेर बसवण्याचा निर्णय कठीण होता पण संघासाठी हा निर्णय घ्यावा लागला असं रहाणेनं सांगितलं.

अश्विनने विंडीजविरुद्ध 11 कसोटी सामने खेळले असून त्यानं गोलंदाजीत 60 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजी करताना चार शतकांच्या सहाय्यानं 552 धावा केल्या आहेत. विंडीजविरुद्ध त्यानं चार वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 23, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या