भारताने विंडीजला लोळवलं, मालिका ३- १ नं जिंकली

भारताने विंडीजला लोळवलं, मालिका ३- १ नं जिंकली

रोहित शर्माने सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय सोपा केला

  • Share this:

तिरुअनंतपुरम, १ नोव्हेंबर २०१८- भारत आणि विंडीजमध्ये खेळवण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवत कसोटीप्रमाणे वनडे मालिकाही खिशात घातली. भारताने ९ गडी राखून विंडीजवर सहज विजय मिळवला. रोहित शर्माने सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय सोपा केला. त्याला कर्णधार विराट कोहलीचीही मोलाची साथ मिळाली. रोहितने ६३ (५६) तर विराटने ३३ (२९) धावांची वेगवान खेळी खेळली. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो ४ गडी बाद करणारा रवींद्र जडेजा. सामनावीर म्हणून त्याला गौरविण्यात आलं तर विराट कोहली मालिकावीर ठरला.

विंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला ३० चा आकडा गाठता आला नाही. विंडीजचा संपूर्ण संघ १०४ धावा करत तंबूत परतला. १०५ धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. ही सलामीची जोडीच भारतासाठी १०५ धावा करेल असे वाटत होते. मात्र भारताने शिखर धवनच्या स्वरूपात एक विकेट गमावली. शिखर धवन ६ धावा करत त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने रोहितला साथ देत सामना जिंकून दिला.

भारताच्या या विजयात गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, खलील अहमद यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. विंडीजकडून कर्णधार होल्डरने सर्वाधिक २५ धावा केल्या. सॅम्युअल्स २४, आर, पॉवेल १६ यांच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत निर्विवाद विजय मिळाल्यानंतर टीम इंडियाचा टी२०तही विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

VIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार

First published: November 1, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading