मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IND vs SL : रणतुंगाच्या टीकेला सूर्यकुमारने दिलं प्रत्युत्तर, द्रविडला म्हणाला...

IND vs SL : रणतुंगाच्या टीकेला सूर्यकुमारने दिलं प्रत्युत्तर, द्रविडला म्हणाला...

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 13 जुलैला सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगाने (Arjuna Ranatunga) भारतीय टीम दुय्यम दर्जाची असल्याचं वक्तव्य केलं, यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

पुढे वाचा ...

कोलंबो, 6 जुलै : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या वनडे सीरिजला 13 जुलैला सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगाने (Arjuna Ranatunga) भारतीय टीम दुय्यम दर्जाची असल्याचं वक्तव्य केलं, यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता टीम इंडियानेही रणतुंगाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने रणतुंगाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणतुंगाने केलेल्या वक्तव्याचा आम्ही विचारही करत नाही, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

'आम्ही रणतुंगाच्या टिप्पणीचा विचार करत नाही, इकडे आम्ही खेळाची मजा घेण्यासाठी आलो आहोत. या सीरिजमधून आम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी घेऊन जायच्या आहेत. मी द्रविडच्या (Rahul Dravid) कोचिंगबद्दल खूप ऐकलं आहे, आता त्यांच्यासोबत हा अनुभव घेता येणार आहे,' असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं.

'राहुल द्रविडच्या शांत स्वभावाचं कौतुक मी अनेकवेळा ऐकलं आहे. अनेक खेळाडूंकडून मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे. आता त्यांच्यासोबत काम करायला मी उत्सुक आहे,' अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारने दिली.

आयपीएलमधून आपली छाप पाडणाऱ्या सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडियामध्ये आगमन केलं. आपल्या पहिल्याच टी-20 मध्ये बॅटिंग करताना त्याने 37 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. आता श्रीलंका दौऱ्यातही त्याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आधीची त्याची ही अखेरची सीरिज आहे. जर त्याने चांगली कामगिरी केली, तर त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्येही निवड होऊ शकते.

First published:
top videos