मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माला सराव करताना दुखापत

IND vs SA : टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माला सराव करताना दुखापत

रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे (Rohit Sharma Injured) दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या (India tour of South Africa) अडचणी वाढल्या आहेत. तीन टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे (Rohit Sharma Injured) दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या (India tour of South Africa) अडचणी वाढल्या आहेत. तीन टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतासाठी दक्षिण आफ्रिका दौरा (India vs South Africa) कायमच अडचणीचा ठरला आहे. आतापर्यंत एकदाही भारताला दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आली नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी दक्षिण आफ्रिका दौरा आव्हानात्मक असणार आहे.

इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्मा बॅटिंग प्रॅक्टिस करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे. थ्रोडाऊन स्पेशलिस्ट राघवेंद्रने टाकलेला बॉल रोहितच्या हाताला लागला, यानंतर तो त्रासात दिसला. बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर नसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कर्णधार विराट कोहली अजूनही टीम इंडियामध्ये दाखल झालेला नाही. वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतल्यामुळे तो नाराज असल्याच्या चर्चाही आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पहिली टेस्ट सेंच्युरियनमध्ये होणार आहे.

कॅप्टनपदावरून हटवल्यानं विराट कोहली नाराज! 'या' कारणामुळे चर्चा तर होणारच...

रोहित-राहुल करणार ओपनिंग

इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी ओपनिंग केली होती. या दोघांना चांगलं यश मिळाल्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेतही दोघं ओपनिंगलाच खेळतील, हे जवळपास निश्चित आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी रोहित शर्माला आराम देण्यात आला होता, तर केएल राहुलला दुखापत झाली होती, तेव्हा मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ओपनिंगला खेळले होते. दुखापतीमुळे गिलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात स्थान मिळालेलं नाही. मयंक अग्रवालने दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार शतक केलं होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा 1-0 ने विजय झाला होता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

स्टॅण्डबाय खेळाडू : दीपक चाहर, अरजान नागसवाला, नवदीप सैनी, सौरभ कुमार

First published: