Home /News /news /

IND vs SA : 'हिरो ते झिरो', विराटचे वाईट दिवस संपता संपेना

IND vs SA : 'हिरो ते झिरो', विराटचे वाईट दिवस संपता संपेना

विराट कोहलीच्या (Virat Kohli) करियरमधले वाईट दिवस काही संपायचं नाव घेत नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa 2nd ODI) विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला.

    पार्ल, 21 जानेवारी : विराट कोहलीच्या (Virat Kohli) करियरमधले वाईट दिवस काही संपायचं नाव घेत नाहीयेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs South Africa 2nd ODI) विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजने (Keshav Maharaj) विराटला आऊट केलं. कोहलीने कव्हरच्या दिशेने मारलेल्या शॉटवर टेम्बा बऊमाने कॅच पकडला. वनडे करियरमध्ये विराट 14 व्यांदा शून्य रनवर आऊट झाला, पण पहिल्यांदाच त्याला स्पिनरने शून्यवर आऊट केलं. महाराजच्या बॉलिंगवर ड्राईव्ह मारताना विराटचं बॅटवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने एका हातानेच शॉट मारला, ज्यामुळे बॉल बऊमाच्या हातात गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराटने 51 रनची खेळी केली. पण मागचा काही काळ विराटच्या करियरसाठी निराशाजनक राहिला. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला एकही शतक करता आलेलं नाही. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधीच विराटने आपण स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. पण टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजलाच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. यावरूनही मोठा वाद निर्माण झाला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं होतं, पण तरीही तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. गांगुलीचं हे वक्तव्य विराटने खोडून काढलं. आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं नव्हतं, असं विराट म्हणाला. तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट टीमची निवड करण्याच्या काही काळ आधी मला तू आता वनडे टीमचा कॅप्टन नसशील असं सांगण्यात आल्याचं विराट म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने पराभव झाला. यानंतर विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचाही राजीनामा दिला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: South africa, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या