मुंबई, 9 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup) लाजिरवाण्या कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये (Team India) मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली, यात टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या 8 खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडल्यामुळे रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच विराट कोहलीला टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय इंग्लंड दौऱ्यापासून क्रिकेट खेळत असलेल्या जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद आणि शार्दुल ठाकूर यांनाही आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांची टीममधून गच्छंती झाली आहे.
रोहित शर्मा टी-20 टीमचा कॅप्टन झाला असला तरी त्याचा मित्र शिखर धवनची टीम इंडियात निवड झाली नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवन या ओपनरनी मर्यादित ओव्हरमध्ये भारताला अनेक ऐतिहासिक पार्टनरशीप करून दिल्या. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर होते तेव्हा श्रीलंका दौऱ्याच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी शिखर धवनला टीमचं कर्णधार करण्यात आलं होतं, पण टी-20 वर्ल्ड कपसाठीही धवनची निवड झाली नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठीही धवनला वगळण्यात आलं आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धमाकेदार कामगिरी करूनही धवनवर विराट आणि रोहित हे दोन्ही कॅप्टन आणि निवड समितीने विश्वास दाखवला नाही.
एक जागा आणि चार खेळाडू
शिखर धवनची (Shikhar Dhawan) टीम इंडियात निवड झाली नसली तरी न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी ओपनरच्या एका जागेसाठी चार खेळाडूंमध्ये रेस आहे. रोहित शर्मा ओपनिंगला खेळेल हे निश्चित आहे, त्यामुळे त्याच्याबरोबरचा दुसरा ओपनर कोण, याचा निर्णय रोहित आणि राहुल द्रविडला घ्यावा लागणार आहे. रोहितसोबतच्या ओपनिंग पार्टनरसाठी केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि व्यंकटेश अय्यर यांच्यात स्पर्धा आहे. या चारही खेळाडूंनी आयपीएलमध्ये ओपनिंगला बॅटिंग करूनच धमाका केला आहे.
भारतीय टीम
रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.