ख्राइस्टचर्च, 02 मार्च : न्यूझीलंडने दुसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताला 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह न्यूझीलंडने भारतीय संघाचा सुपडा साफ केला आणि 2-0 अशी मालिका जिंकली. सामन्याच्या तिसर्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने 3 गडी न गमावून 132 धावांचं विजयी लक्ष्य गाठलं. यजमानांकडून टॉम लॅथम 52 आणि टॉम ब्लंडेलनं 55 अशा धावा केल्या.
याआधी भारतीय संघाने 6 विकेट्सवर 90 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. कोणताही भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नाबाद फलंदाज हनुमा विहारी 9 धावांवर बाद झाला आणि ऋषभ पंतने अवघ्या 4 धावा केल्या. रवींद्र जडेजा 16 धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बाऊल्टने 4 आणि टीम साऊथीने 3 गडी बाद केले.
तिसर्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर यजमान न्यूझीलंडनं अवघ्या 47 मिनिटांत टीम इंडियाचा दुसरा डाव 124 धावांनी कमी केला आणि यजमानांना विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य दिलं. टीम इंडियाने तिसर्या दिवसाची सुरूवात 90 धावांत सहा गडी राखून केली. परंतु दिवसाचा पहिला धक्का 97 धावांनी हनुमा विहारीच्या रुपात दिवसाचा पहिला धक्का बसला आणि दिवसाचा दुसरा धक्का ऋषभ पंत 97 धावांवर बाद आला.
यानंतर रवींद्र जादंजाने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या साथीने डाव 124 धावांवर नेला. जडेजा 16 धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत न्यूझीलंडने कोणत्याही नुसकानीशिवाय 46 धावा केल्या आणि ते फक्त 86 धावा मागे होते.
A steady start by Latham and Blundell.
New Zealand are now 100 runs away from victory and a 2-0 series win 🏆 #NZvIND pic.twitter.com/90RkI9cPD9
— ICC (@ICC) March 2, 2020
Day 2 मॅच रिपोर्ट
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा सुमार कामगिरी केली होती. भारताचा दुसऱ्या दिवसाचा खेळ 90-6 धावांवर संपला. केवळ 90 धावांत भारतानं 6 विकेट गमावत 97 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही कर्णधार विराट कोहली पुन्हा सपशेल अपयशी ठरत 14 धावांवर बाद झाला.
हे वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टेम्पोचा अपघात, लघुशंकेसाठी गेलेल्या 5 मित्रांचा मृत्यू
दुसऱ्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारतानं पहिली विकेट गमावली. मयंक अग्रवाल केवळ 3 धावा करत माघारी गेला. त्यामुळं या डावातही सलामीवीरांना चांगली खेळी करता आली नाही. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सलग चौथ्या डावात विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय फलंदाजांची एकामागोमाग एक रांग लावली. कोहलीनंतर लगेचच अजिंक्य रहाणे 9 धावांवर, पुजारा 24 तर उमेश यादव एक धाव करत माघारी परतला.
याआधी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी केली. पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला चांगल्या स्थितीत पोहचवलं. याआधी कायलने 5 विकेट घेत भारतीय फलंदाजाचं कंबरडं मोडलं होतं. तर, फलंदाजीमध्ये त्यानं 49 धावांची खेळी केली. त्यामुळं दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघानं 235 धावांपर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजांमुळे चांगली गोलंदाजी करूनही भारताला केवळ 7 धावांची आघाडी मिळाली आहे.
हे वाचा - '...जेव्हा बाळासाहेब लुंगीवर मातोश्रीबाहेर पडतात', राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा खेळ 63-0वर थांबला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच उमेश यादवनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. टॉम ब्लंडेल 30 धावांवर बाद झाल्यानंतर केन विल्यम्सनलाही बुमराहनं 3 धावांवर बाद केलं. न्यूझीलंडची मधली फळी अयशस्वी ठरली असली तरी, तळाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, उमेश यादवने 1 तर रवींद्र जडेजानं कायलला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.
हे वाचा - 'दिल्लीतल्या दंगली काँग्रेसने घडवल्या', रामदास आठवले यांचा गंभीर आरोप