मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Ind Vs Eng: विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय, गेल्या 31 डावांत एकही शतक नाही

Ind Vs Eng: विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय, गेल्या 31 डावांत एकही शतक नाही

विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या 14 महिन्यांपासून मोठा खेळ खेळता (Not made single century) आलेला नाही. चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली 69 मिनिटे क्रीझवर राहिल्यानंतरही फलंदाजी करताना त्याला अडचणी जाणवत होत्या.

पुढे वाचा ...

चेन्नई, 08 फेब्रुवारी: सध्याच्या पिढीचा एक महान फलंदाज म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli) ओळख आहे. एकदिवसीय आणि टी-20 (T-20) व्यतिरिक्त कोहली कसोटी क्रिकेटमध्ये देखील अव्वल फलंदाजांच्या यादीत आहे. घरच्या मैदानावर फलंदाजी करतानाची त्याची सरासरी सर्वाधिक आहे. कोहलीनंतर चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) नंबर लागतो. पण विराट कोहलीला गेल्या 14 महिन्यांपासून मोठा खेळ खेळता आलेला नाही. चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली 69 मिनिटे क्रीझवर राहिल्यानंतरही फलंदाजी करताना त्याला अडचणी जाणवत होत्या. यावेळी तो 48 चेंडूत अवघ्या 11 धावा काढून बाद झाला.

गेल्या तीन वर्षांत भारताच्या भूमीवर फिरकी गोलंदाजाकडून आऊट होण्याची ही विराटची केवळ दुसरी वेळ आहे. कोहलीला यावेळी जोफ्रा आर्चर वेगवान गोंलदाजीपुढे आणि डॉम बेसच्या फिरकीपुढे विराट अडखळताना दिसला. इंग्लंडच्या 23 वर्षीय युवा फिरकीपटू डोम बेसने कोहलीला बराच त्रास दिला. डॉम बेसच्या फिरकी बॉलवर कोहलीने शॉर्ट लेगमध्ये एक सोपा झेल दिला आहे. विराटने शेवटच्या सात कसोटी सामन्यात  18.14 च्या सरासरीने केवळ 127 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

(वाचा - उत्तराखंडमधील घटनेनंतर ऋषभ पंतने असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक)

2020 पासून विराटने 23 सामन्यांतील 25 डावांमध्ये 35.54 च्या सरासरीने केवळ 853 धावा केल्या आहेत. कोहलीने या काळात सात अर्धशतकं ठोकली आहेत. गेल्या वर्षापासून विराटचं एकही शतक झळकलं नाही. 2020 मध्ये विराट 30 धावा करण्यापूर्वी 14 वेळा बाद झाला आहे. टॉप ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या कोहलीसाठी हा अत्यंत खराब आकडा आहे. कोहलीने गेल्या 31 डावांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय शतक ठोकलेलं नाही.

विराटच्या क्रिकेट कारकीर्दीत असं पहिल्यांदाच होतंय असं नाही. शेवटच्या वेळी 2014 सालच्या बांग्लादेशमधील एशिया चषकपासून  वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका दरम्यानच्या 8 महिन्यांत  25 डावांमध्ये विराटला एकही शतक ठोकता आलं नव्हतं. विराटने शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये ईडन गार्डन्सवरील डे-नाईट कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध झळकावलं होतं.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Sports