Home /News /news /

IND vs ENG : बाऊन्सरच्या माऱ्यासमोर उघडा पडला श्रेयस अय्यर, इंग्लंडच्या सापळ्यात असा अडकला, VIDEO

IND vs ENG : बाऊन्सरच्या माऱ्यासमोर उघडा पडला श्रेयस अय्यर, इंग्लंडच्या सापळ्यात असा अडकला, VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने (India vs England 5th Test) विकेट गिफ्टसारख्या दिल्या. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा बाऊन्सरवर आऊट झाला.

    एजबॅस्टन, 4 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने (India vs England 5th Test) विकेट गिफ्टसारख्या दिल्या. दिवसाच्या सुरूवातीला चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) कट मारण्याचा प्रयत्न केला, पण पॉईंटला उभ्या असलेल्या ऍलेक्स लीसने पुजाराचा कॅच पकडला, यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा बाऊन्सरवर आऊट झाला, तर ऋषभ पंत (Rishabh Pant) स्पिनर जॅक लिचच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्विप मारायला गेला, पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या जो रूटने त्याचा कॅच पकडला. चेतेश्वर पुजाराने 66, ऋषभ पंतने 57 तर श्रेयस अय्यरने 19 रनची खेळी केली. दिवसाची पहिली विकेट चेतेश्वर पुजाराच्या रुपात गेल्यानंतर श्रेयस अय्यर बॅटिंगसाठी मैदानात उतरला. अय्यर बॅटिंगला येताच इंग्लंडच्या फास्ट बॉलरनी त्याच्यावर बाऊन्सरचं आक्रमण केलं. ड्रेसिंग रूममध्ये असलेला इंग्लंडचा कोच ब्रॅण्डन मॅक्कलमनेही श्रेयस अय्यरला बाऊन्सर टाकण्याचा इशारा केला. इंग्लंडच्या बॉलर बाऊन्सर टाकणार असल्याचं दिसत होतं तरी श्रेयस अय्यर त्यांच्या या सापळ्यात अडकला. मॅटी पॉट्सच्या बाऊन्सरवर श्रेयस अय्यरने पूल शॉट मारला, पण जेम्स अंडरसनने त्याचा कॅच पकडला. बाऊन्सरसाठी पॉट्सने लेग साईडला तीन फिल्डर ठेवले होते, तरीही श्रेयस अय्यरला पूल शॉट मारण्याचा मोह आवरला नाही आणि यातच तो फसला. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंट्री करत असलेल्या नासीर हुसैन यांनीही श्रेयस अय्यरने खेळलेल्या शॉटवर टीका केली. श्रेयस अय्यर अत्यंत खराब शॉट खेळल्याचं नासीर हुसैन म्हणाले. याआधी पहिल्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या बॉलरनी श्रेयस अय्यरला बाऊन्सर टाकले होते. तेव्हाही बाऊन्सर लेग साईडला खेळण्याच्या नादात श्रेयस अय्यरने विकेट कीपर सॅम बिलिंग्सला कॅच दिला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Shreyas iyer

    पुढील बातम्या