मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

IND vs ENG : खणखणीत सिक्स मारत 'हिटमॅन'चं शतक, भारताबाहेरची पहिलीच सेंच्युरी, VIDEO

IND vs ENG : खणखणीत सिक्स मारत 'हिटमॅन'चं शतक, भारताबाहेरची पहिलीच सेंच्युरी, VIDEO

फोटो सौजन्य : बीसीसीआय

फोटो सौजन्य : बीसीसीआय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने (Rohit Sharma Century) खणखणीत शतक केलं आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 4 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) रोहित शर्माने (Rohit Sharma Century) खणखणीत शतक केलं आहे. मोईन अलीच्या (Moeen Ali) बॉलिंगवर रोहित शर्माने सिक्स मारत आपलं टेस्ट क्रिकेटमधलं 8 वं शतक झळकावलं. टेस्ट क्रिकेटमधलं रोहितचं भारताबाहेरचं हे पहिलंच शतक आहे. याआधीची सगळी 7 शतकं रोहितने भारतातच झळकावली होती.

रोहित शर्माने त्याच्या या शतकी खेळीवेळीच टेस्ट क्रिकेटमधले आपले 3 हजार रनही पूर्ण केले. ओव्हल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित शर्माने ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 11 हजार आंतरराष्ट्रीय रन पूर्ण केले. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या भारतीयांनाच हा विक्रम करता आला होता.

रोहित शर्माने 11 हजार रनचा हा टप्पा सचिननंतर सगळ्यात जलद पूर्ण केला. सचिनला एवढ्या रन करण्यासाठी 241 इनिंग लागल्या होत्या आणि मॅथ्यू हेडनने 251 इनिंगमध्ये 11 हजार रन पूर्ण केले. भारताकडून ओपनर म्हणून सर्वाधिक 16119 रन सेहवागने केले. सचिनने 15335 रन आणि गावसकर यांनी 12258 रन केले होते.

याआधी शुक्रवारी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार रनचा टप्पाही पार केला होता. हे रेकॉर्ड करणारा रोहित 8 वा भारतीय खेळाडू आहे. याआधी सचिन, द्रविड, विराट, गांगुली, धोनी, सेहवाग आणि अझरुद्दीन यांनी हा कारनामा केला होता.

First published: